Rishabh Pant Dainik Gomantak
क्रीडा

Rishabh Pant: 'मी या दोघांचा सदैव ऋणी राहीन...', कार अपघातानंतर ऋषभची पहिली पोस्ट

Rishabh Pant: पंत म्हणाला की, 'रजत कुमार आणि निशू कुमार यांचे मी आभार मानतो. त्यांनी मला सुरक्षितरित्या रुग्णालयात पोहोचवले.

दैनिक गोमन्तक

Rishabh Pant: भारतीय क्रिकेटपटू ऋषभ पंतचा 30 डिसेंबर रोजी भीषण अपघात झाला. यानंतर प्रथमच त्याची प्रतिक्रीया आली आहे. पंतने सोमवारी संध्याकाळी ट्विटरववरुन आपल्या भावना प्रकट केल्या, ज्यामध्ये तो म्हणाला की, 'तुम्ही दिलेल्या शुभेच्छा आणि पाठिंब्यासाठी मी कृतज्ञ आहे. मला तुम्हाला सांगायला आनंद वाटतोय की माझी शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे. आता यातून सावरण्याचा कालावधी सुरु झाला आहे. मी पुढील आव्हानांसाठी सज्ज आहे. बीसीसीआय (BCCI), जय शाह आणि सरकारी अधिकाऱ्यांना अविश्वसनीय पाठिंब्याबद्दल धन्यवाद.'

दरम्यान, त्याच्या पहिल्या सार्वजनिक पोस्टमध्ये, पंत म्हणाला की, 'रजत कुमार आणि निशू कुमार यांचे मी आभार मानतो. त्यांनी मला सुरक्षितरित्या रुग्णालयात (Hospital) पोहोचवले. मी त्यांचा सदैव ऋणी राहीन.'

तसेच, पंतच्या या पोस्टला जगभरातून खूप प्रेम, पाठिंबा आणि शुभेच्छा मिळाल्या आहेत. हे ट्विट आत्तापर्यंत 5,000 पेक्षा जास्त वेळा रिट्विट केले गेले आहे. तर 545.7k पेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत.

दुसरीकडे, Ceteris Paribus नावाच्या एका ट्विटर यूजर्सने लिहिले की, "छान. रजत कुमार आणि निशू कुमार खूप छान... असे लोक पाहिजेत." दुसरा म्हणाला की, "छान भाऊ @RishabhPant17.... तुम्ही समाजासमोर एक आदर्श ठेवला आहे."

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: किंग कोब्राला चक्क किस करण्याचा प्रयत्न; पुढच्या क्षणी जे झालं ते पाहून लोकांची धाकधूक वाढली, पाहा व्हायरल व्हिडिओ

Election Commission: केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कारवाईला आम्ही कंटाळलो! 'गोवा काँग्रेस पक्ष' नोंदणी प्रक्रियेसंदर्भात कोर्ट नाराज

VIDEO: वकिलाची गाडी अडवून मारहाण अन् शिवीगाळ, आमदार पुत्राची गुंडगिरी; तक्रारीनंतरही FIR नाही, पोलिसांच्या भूमिकेवर सवाल!

Myanmar Airstrike: म्यानमारमध्ये मृत्यूचं भयानक तांडव! गजबजलेल्या बाजारात अचानक हवाई हल्ला; 49 जणांचा मृत्यू; 58 जखमी, थरारक VIDEO समोर

Horoscope: संकष्टी चतुर्थीला जुळून आलाय अत्यंत दुर्मिळ शुभ योग! बाप्पाच्या आशीर्वादाने 'या' 5 राशींचे उघडणार नशिबाचे दरवाजे, नोकरी-व्यवसायात प्रगतीचे संकेत

SCROLL FOR NEXT