Rishabh Pant: भारतीय क्रिकेट संघाचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत याचा 30 डिसेंबर 2022 रोजी कार अपघात झाला. त्यामुळे सध्या त्याच्यावर मुंबईत उपचार सुरू आहेत. दरम्यान, आता पंत या अपघातातून सावरून क्रिकेट मैदानात कधी परतू शकतो, असे प्रश्न अनेक चाहत्यांना पडला आहे. याबद्दल बीसीसीआयचा माजी अध्यक्ष सौरव गांगुलीने प्रतिक्रिया दिली आहे.
सध्या अशी चर्चा आहे की पंतला झालेल्या दुखापतींमधून सावरण्यासाठी कमीत कमी 6 महिन्यांचा कालावधी लागू शकतो. त्यामुळे तो आयपीएल 2023 हंगामालाही मुकण्याची शक्यता आहे. पंत आयपीएलमधील संघ दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार आहे. त्यामुळे त्यांना मोठा धक्का बसू शकतो.
दरम्यान, दिल्ली कॅपिटल्सच्या क्रिकेट संचालकपदी नियुक्त करण्यात आलेल्या गांगुलीने पंतच्या आयपीएलमधील समावेशाबद्दल महत्त्वाची माहिती दिली.
रिपोर्ट्सनुसार त्याने कोलकातामध्ये पत्रकारांना सांगितले की 'त्याला बरे होण्यासाठी वेळ लागेल. आपण याबाबत काही करू शकत नाही. हा अपघात होता. तो केवळ 25 वर्षांचा आहे, त्याच्याकडे अजूनही भरपूर वेळ आहे.'
'पंत आयपीएलसाठी उपलब्ध नसेल. मी दिल्ली कॅपटल्सच्या संपर्कात आहे. हा आयपीएल हंगाम चांगला असेल, आशा आहे आम्ही चांगली करू. पण पंतची अनुपस्थितीत दिल्ली कॅपिटल्सवर नक्कीच परिणाम करेल.'
आयपीएल 2023 हंगाम मार्चच्या अखेरीस सुरु होण्याची शक्यता आहे. दरम्यान, या हंगामासाठी दिल्ली कॅपिटल्सचे कर्णधारपद पंतच्या अनुपस्थितीत ऑस्ट्रेलियाच्या डेव्हिड वॉर्नरकडे सोपवली जाण्याची शक्यता आहे.
(Rishabh Pant is available or not for IPL2023 Sourav Ganguly provides update)
पंतची प्रकृती स्थिर
पंत 30 डिसेंबर रोजी दिल्लीहून रुडकीला येत असताना त्याची कार नारसन बॉर्डरजवळ डिव्हायडरला धडकली. पण अपघातानंतर कारमधून बाहेर पडण्यात पंतला यश आले. त्याला नंतर त्याच रस्त्यावरून जाणाऱ्या एका बसच्या ड्रायव्हर आणि कंडक्टरने त्याला स्थानिक हॉस्पिटलमध्ये पोहवण्यात मदत केली.
पंतला नंतर डेहराडूनमधील मॅक्स हॉस्पिटमध्ये हलवण्यात आले. तिथे काहीदिवस उपचार घेतल्यानंतर त्याला मुंबईतील कोकिलाबेन अंबानी हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. इथे त्याच्यावर सध्या उपचार सुरू असून बीसीसीआयची मेडिकल टीमही त्याच्या प्रकृतीकडे लक्ष ठेवून आहे.
दरम्यान, बीसीसीआयने दिलेल्या माहितीनुसार पंतला डोक्याला, हाताच्या मनगटाला, पायाला आणि पाठीला दुखापती झाल्या आहेत. तसेच गुडघ्यात लिगामेंट टिअर्स आहेत. पण त्याची प्रकृती स्थिर असून त्याच्या जीवाला कोणताही धोका नाही.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.