IPL 2022 RCB vs PBKS dainik gomantak
क्रीडा

IPL 2022 RCB vs PBKS : आरसीबीचं पंजाबसमोर 206 धावांचं लक्ष्य

पंजाबची चांगली सुरूवात; 6 षटकांत 63 धावा

दैनिक गोमन्तक

IPL 2022: आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील तिसऱ्या सामन्यात पंजाब आणि बंगळुरू यांच्यात मुंबईच्या डी.व्हाय.पाटील स्टेडीअमवर सामना सुरू असून पंजाब किंग्जचा कर्णधार मयंक अग्रवालने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. यावेळी प्रथम प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या आरसीबीच्या संघानं 20 षटकात 2 विकेट्स गमावत 206 धावांचं लक्ष्य पंजाब किंग्जसमोर ठेवलं आहे. यावेळी डू प्लेसिस याने विस्फोटक फलंदाजी करताना 57 चेंडूत 88 धावा ठोकल्या आहे. त्याने 7 षटकार आणि तीन चौकारांच्या जोरावर 88 धावा केल्या आहे. (RCB has given a target of 206 runs to Punjab to win)

दरम्यान आयपीएलच्या हंगामात आरसीबीच्या 206 धावांचा पाठलाग करताना पंजाबने चांगली सुरूवात करताना 6 षटकांत 63 धावांचा टप्पा गाठला आहे. तर दोन्ही संघांची कमान नव्या खेळाडूंच्या हाती आहे. प्रीती झिंटाच्या सह-मालक असलेल्या पंजाब (Punjab) किंग्जची धुरा मयंक अग्रवालच्या हातात आहे. त्याचबरोबर विराट कोहलीने कर्णधारपद सोडल्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने संघाची कमान दक्षिण आफ्रिकेचा महान खेळाडू फाफ डू प्लेसिसकडे सोपवली आहे.

पंजाब किंग्ज (Punjab) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (Bangalore) यांच्यात आतापर्यंत 28 सामने झाले आहेत. यातील 13 सामने जिंकण्यात आरसीबीला यश आले आहे. पंजाब किंग्जने 15 सामन्यांमध्ये आपली धुरा वाहिली आहे. मात्र, आतापर्यंत या दोघांमध्ये भारतात 22 सामने खेळले गेले आहेत. या दोन्ही संघांना 11-11 सामने जिंकण्यात यश आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

Goa News Live: अडवलपालमध्ये गढूळ पाण्याचा पुरवठा, 'फोमेंतो' कंपनीच्या रिजेक्शनमुळे समस्या

Pandharpur Wari: 1566 साली लोक जुने गोवेतील रस्त्यांतून, अभंग म्हणत वारीला जात असल्याची नोंद आहे..

SCROLL FOR NEXT