Virat Kohli | Anushka Sharma Dainik Gomantak
क्रीडा

Virat-Anushka Video Call: पहिला फोन बायकोलाच...! RCB ने मॅच जिंकताच विराट अन् अनुष्काचा रोमँटिक व्हिडिओ कॉल व्हायरल

गुरुवारी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने मॅच जिंकल्यानंतर विराटने अनुष्काला व्हिडिओ कॉल केलेला.

Pranali Kodre

Virat Kohli and Anushka Sharma Video Call: गुरुवारी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेतील 65 व्या सामन्यात सनरायझर्स हैदाराबाद संघाला 8 विकेट्सने पराभूत केले. बेंगलोरच्या या विजयात विराट कोहलीने महत्त्वाचा वाटा उचलला. विराटने शतकी खेळी केली.

दरम्यान, या सामन्यानंतर विराट आणि त्याची पत्नी बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा यांचा व्हिडिओ कॉल चांगलाच चर्चेत आला आहे.

झाले असे की सामना जिंकल्यानंतर काहीवेळातच विराटने अनुष्काला व्हिडिओ कॉल केला होता. या वेळी तो तिच्याशी खूपच आनंदाने बोलत असल्याचे दिसले होते. या गोड क्षणांचे व्हिडिओ आणि फोटो सध्या सोशल मीडियावर वाऱ्यासारखे व्हायरल होत आहेत.

विराटसाठी अनुष्का नेहमीच त्याची सर्वात महत्त्वाच्या व्यक्तींपैकी एक राहिली आहे. अनुष्काही अनेकदा विराटला स्टेडियममध्ये उपस्थित राहुन प्रोत्साहन देताना दिसली आहे. तिने गुरुवारी विराटने शतक केल्यानंतर इंस्टाग्राम स्टोरीवर एक खास पोस्टही केली होती.

तिने या सामन्यादरम्यानचे आणि विराटच्या शतकाच्या क्षणांचे काही फोटो शेअर केले होते. तसेच तिने त्याच्या खेळीचे कौतुकही केले होते.

चार वर्षांनी विराटचे विक्रमी शतक

दरम्यान, विराटने आयपीएलमध्ये तब्बल 4 वर्षांनी शतक केले. त्याने यापूर्वी 2019 आयपीएलमध्ये शतक केले होते. विराटचे हे आयपीएल कारकिर्दीतील एकूण 6 वे शतक ठरले आहे. त्यामुळे आयपीएलमध्ये सर्वाधिक शतके करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत विराटने ख्रिस गेलची बरोबरी केली आहे. गेलनेही आयपीएलमध्ये 6 शतके केले आहेत.

बेंगलोरचा विजय

दरम्यान, या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने हेन्रिक क्लासेनच्या 104 धावांच्या शतकी खेळीच्या जोरावर 20 षटकात 5 बाद 186 धावा केल्या. त्यानंतर 187 धावांच्या आव्हानाचा पाठलाग बेंगलोरने 19.2 षटकात 2 विकेट्स गमावत हे आव्हान सहज पूर्ण केले.

बेंगलोरकडून विराटने 63 चेंडूत 100 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने 12 चौकार आणि 4 षटकार मारले. तसेच फाफ डू प्लेसिसने 47 चेंडूत 71 धावांची खेळी केली. या दोघांनी सलामीला 172 धावांची भागीदारी केली. त्यामुळे बेंगलोरला या सामन्यात विजय मिळवणे सोपे गेले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT