Virat -Anushka Viral Video: आधी गौतम गंभीरशी भांडण आता अनुष्कासह देवदर्शन...सोशल मिडीयावर विराटचीच चर्चा..

अनुष्काच्या वाढदिवसादिवशीच विराटने गौतम गंभीरशी भांडण केले आणि आता दोघे देवदर्शनाला गेले आहेत.
Virat -Anushka Viral Video
Virat -Anushka Viral VideoDainiik Gomantak
Published on
Updated on

Virat -Anushka Viral Video: गेल्या काही दिवसांनी अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि विराट कोहली हे कपल सोशल मिडीयावर सातत्याने चर्चेत आहेत. अनुष्का शर्मा आणि विराट कोहली पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आहेत कारण त्यांनी अलीकडेच एका मंदिराला भेट दिली. 

1 मे रोजी एलएसजी आणि आरसीबी सामन्यादरम्यान गौतम गंभीरसोबत शाब्दिक वाद घालणारा हा कर्णधार विराट कोहली पत्नी अनुष्कासोबत मंदिरात आशीर्वाद घेताना दिसला.

आयपीएल सामन्यासाठी लखनौमध्ये असलेले विराट आणि अनुष्का एका मंदिरात जाताना दिसले . एका पॅप अकाउंटने शेअर केलेला व्हिडिओ व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये भारतीय कर्णधार धोतर आणि गळ्यात शाल बांधलेला दिसत होता, तर दुसरीकडे अनुष्का साडी नेसलेली दिसत होती.

यापूर्वी मार्चमध्ये विराट कोहली आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा यांनी मध्य प्रदेशातील उज्जैन येथील महाकालेश्वर मंदिराला भेट दिली होती. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये हे जोडपे मोठ्याने प्रार्थना करताना शिवलिंगाला दूध अर्पण करताना दिसत आहे.

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) 2023 मध्ये लखनौ सुपर जायंट्स (एलएसजी) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (आरसीबी) यांच्यात सोमवारी, लखनौ येथे झालेल्या सामन्यानंतर विराट कोहली आणि गौतम गंभीर यांना त्यांच्या मॅच फीच्या 100 टक्के दंड ठोठावण्यात आला आहे.

Virat -Anushka Viral Video
Priyanka - Sam Viral Video: सॅम ह्यूघनने सर्वांसमोर प्रियांका चोप्राला केलं किस? फोटो व्हायरल

 लखनौमधील भारतरत्न श्री अटलबिहारी वाजपेयी एकना स्टेडियमवर हा सगळा ड्रामा बघायला मिळाला.

खेळानंतर, कोहली आणि गंभीर यांच्यात शाब्दिक वादावादी झाली ज्यानंतर अमित मिश्रा, आरसीबीचा फाफ डू प्लेसिस आणि एलएसजीचे सहाय्यक प्रशिक्षक विजय दहिया यांना या वादाच शांतता आणावी लागली. नंतर कोहली एलएसजीचा कर्णधार केएल राहुलशी बोलतानाही दिसला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com