Ravindra Jadeja  Dainik Gomantak
क्रीडा

IND vs SA: युवराजनंतर 'रविंद्र'च; सर जडेजाची ईडन गार्डन्सवर अविश्वसनीय कामगिरी

World Cup 2023: एकदिवसीय विश्वचषक 2023 चा 37 वा सामना आज (5 नोव्हेंबर) ईडन गार्डन्सवर खेळला गेला.

Manish Jadhav

World Cup 2023: एकदिवसीय विश्वचषक 2023 चा 37 वा सामना आज (5 नोव्हेंबर) ईडन गार्डन्सवर खेळला गेला. या रोमांचक सामन्यात भारतीय संघाचा सामना दक्षिण आफ्रिकेच्या संघाशी झाला.

मेन इन ब्लू संघाने या सामन्यात 243 धावांनी दणदणीत विजय मिळवला. या सामन्यादरम्यान स्टार अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाने मोठी कामगिरी आपल्या नावावर केली. खालच्या क्रमवारीत फलंदाजी करताना त्याने 15 चेंडूत नाबाद 29 धावांची मौल्यवान खेळी खेळली.

दरम्यान, गोलंदाजीतही जडेजाने आपला ठसा उमटवला. भारतीय संघासाठी नऊ षटके गोलंदाजी करताना, त्याने 3.66 च्या इकॉनॉमीने 33 धावा देऊन सर्वाधिक पाच विकेट्स घेतल्या. त्याच्या विकेट्समध्ये दक्षिण आफ्रिकेचा (South Africa) कर्णधार टेम्बा बावुमा, हेन्रिच क्लासेन, डेव्हिड मिलर, केशव महाराज आणि कागिसो रबाडा यांचा समावेश आहे.

जडेजाने विशेष कामगिरी केली

या सामन्यादरम्यान रवींद्र जडेजाने (Ravindra Jadeja) विशेष कामगिरी केली. भारतासाठी विश्वचषकातील सामन्यात भारतीय फिरकीपटू म्हणून सर्वोत्तम कामगिरी करणारा तो दुसरा खेळाडू ठरला. यामध्ये माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगचे नाव पहिल्या क्रमांकावर येते. युवराजने 2011 मध्ये बंगळूरु येथे आयर्लंडविरुद्ध 31 धावांत पाच विकेट्स घेतल्या होत्या. आजच्या सामन्यात रवींद्र जडेजाने 33 धावा देत 5 विकेट्स घेतल्या.

विश्वचषकात भारतीय फिरकीपटूची सर्वोत्तम कामगिरी:

5/31 – युवराज सिंग – विरुद्ध आयर्लंड – बंगळूरु – 2011

5/33 - रवींद्र जडेजा - विरुद्ध दक्षिण आफ्रिका - कोलकाता - 2023

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asaduddin Owaisi On Dhurandhar 2: 'मुसलमानांना शिव्या देणे गरजेचे आहे का?' ओवैसींचा 'धुरंधर 2' वर हल्लाबोल; चित्रपटाला म्हणाले 'बकवास'!

VIDEO: दर्शनाची आस अन् वाटेतच मृत्यूचा फास! बंगळुरु महामार्गावर उभ्या असणाऱ्या बसला कारची जोरदार धडक, तीन जणांचा मृत्यू

सीमा पार रणवीरची एन्ट्री! कराचीच्या रस्त्यांवर केलं गुपचूप शूटिंग, पाकिस्तानी नागरिक झालेत 'येडे'; केला अजब दावा Watch Video

Iran US War: यूएसएस जेराल्ड आर. फोर्डवर इराणचा भीषण हल्ला! ट्रम्प यांचा खळबळजनक दावा; 'जीव वाचवण्यासाठी अमेरिकन सैन्यानं काढला पळ'

Goa Drunk And Drive: कळंगुट वाहतूक पोलिसांचा मोठा दणका! मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवणाऱ्या 165 जणांवर कारवाई; 4000 हून अधिक उल्लंघनकर्त्यांना दंड

SCROLL FOR NEXT