Goa Drunk And Drive: कळंगुट वाहतूक पोलिसांचा मोठा दणका! मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवणाऱ्या 165 जणांवर कारवाई; 4000 हून अधिक उल्लंघनकर्त्यांना दंड

Calangute Traffic Cell Enforcement Drive: गोव्यातील सर्वात गजबजलेला पर्यटन पट्टा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कळंगुट परिसरात रस्ते सुरक्षा आणि वाहतुकीचे नियम पाळण्यासाठी वाहतूक पोलिसांनी आपली मोहीम अधिक तीव्र केली.
Calangute Traffic Cell Enforcement Drive
Goa Drunk And DriveDainik Gomantak
Published on
Updated on

कळंगुट: गोव्यातील सर्वात गजबजलेला पर्यटन पट्टा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कळंगुट परिसरात रस्ते सुरक्षा आणि वाहतुकीचे नियम पाळण्यासाठी वाहतूक पोलिसांनी आपली मोहीम अधिक तीव्र केली. 1 जानेवारी 2026 पासून आतापर्यंत केलेल्या विशेष कारवाईत मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवणाऱ्या (Drunk and Drive) 165 चालकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले. पर्यटकांची मोठी गर्दी असलेल्या या भागात अपघातांचे प्रमाण रोखण्यासाठी कळंगुट वाहतूक विभागाने उचललेले हे एक मोठे पाऊल मानले जात आहे.

केवळ मद्यप्राशन करुन गाडी चालवणाऱ्यांवरच नाही, तर वाहतुकीच्या इतर नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवरही पोलिसांनी कडक नजर ठेवली. गेल्या तीन महिन्यांच्या कालावधीत एकूण 4,045 वाहतूक नियमांच्या उल्लंघनाची प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत. यामध्ये विना हेल्मेट दुचाकी चालवणे, सीट बेल्ट न लावणे, वेगाने गाडी चालवणे, नो-पार्किंगमध्ये वाहने उभी करणे आणि परवाना नसताना वाहन चालवणे अशा विविध प्रकारच्या गुन्ह्यांचा समावेश आहे. या सर्व कारवायांमधून प्रशासनाने मोठ्या प्रमाणावर दंड वसूल केला असून, नियम तोडणाऱ्यांना कडक इशारा दिला.

Calangute Traffic Cell Enforcement Drive
CM Pramod Swant: सभापती अन् मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचण्याचे कारण 'आयुर्वेद'

पर्यटन हंगाम सुरु असल्याने कळंगुट (Calangute) आणि आसपासच्या किनारी भागात वाहनांची मोठी वर्दळ असते. अनेकदा पर्यटक आणि स्थानिक तरुण मद्यधुंद अवस्थेत वाहने चालवतात, ज्यामुळे गंभीर अपघात होऊन जीवितहानी होण्याचा धोका असतो. हे टाळण्यासाठी वाहतूक पोलिसांनी ठिकठिकाणी नाकाबंदी करुन 'ब्रीथ ॲनालायझर'च्या साहाय्याने तपासणी सुरु केली. विशेषतः रात्रीच्या वेळी ही मोहीम अधिक तीव्र करण्यात आली. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांचे परवाने निलंबित करण्यासाठी परिवहन विभागाकडे शिफारस देखील केली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com