Virat Kohali Dainik Gomantak
क्रीडा

'या' खेळाडू च्या आगमणाने, विराट कोहली संघाबाहेर जाणार...

रवींद्र जडेजा पूर्णपणे तंदुरुस्त झाला असून तो आगामी श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत खेळताना दिसणार आहे. विराट कोहली मालिकेसाठी विश्रांती घेऊ शकतो

दैनिक गोमन्तक

टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. रवींद्र जडेजा पूर्णपणे तंदुरुस्त झाला असून तो आगामी श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत (भारताचा श्रीलंका दौरा 2022) खेळताना दिसणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, जडेजा श्रीलंकेविरुद्धच्या (Sri Lanka) दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत तसेच 3 सामन्यांच्या टी-20 मालिकेत खेळणार आहे. जडेजा शेवटचा कानपूर कसोटीत न्यूझीलंडविरुद्ध खेळला होता. दुखापतग्रस्त जडेजा बंगळुरू येथील नॅशनल क्रिकेट अकादमीमध्ये त्याच्या फिटनेसवर काम करत होता. आता जडेजा तंदुरुस्त असून तो लखनऊला पोहोचला आहे जिथे श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 मालिकेतील पहिला सामना खेळवला जाणार आहे.

क्रिकबजच्या वृत्तानुसार, जडेजासोबत जसप्रीत बुमराहही (Jasprit Bumrah) या मालिकेत पुनरागमन करणार आहे. दोन्ही खेळाडूंची वेस्ट इंडिजविरुद्ध सुरू असलेल्या वनडे आणि टी-20 मालिकेसाठी निवड करण्यात आली नव्हती. जसप्रीत बुमराह, जडेजा आणि मोहम्मद शमी यांना विश्रांती देण्यात आल्याचे बीसीसीआयने सांगितले होते. जडेजाच्या गुडघ्याला दुखापत झाली.

विराट कोहली घेणार विश्रांती

क्रिकबझच्या रिपोर्टनुसार, विराट कोहली (Virat Kohli) श्रीलंका टी-20 मालिकेत खेळू शकत नाही. विराट कोहली मालिकेसाठी विश्रांती घेऊ शकतो. मात्र, तो कसोटी मालिकेत खेळणार आहे. विराट कोहली आपला 100 वा कसोटी सामना मोहालीत खेळणार आहे. जर विराट पहिल्या कसोटीत खेळला नाही, तर त्याची 100 वी कसोटी ही बंगळुरूमध्ये होऊ शकते.

रोहित शर्मा कसोटी कर्णधार बनणार

वृत्तानुसार, श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेपूर्वीच टीम इंडियाच्या नवीन कसोटी कर्णधाराची घोषणा केली जाईल. त्यामुळे रोहित शर्मा पुढील कसोटी कर्णधार असेल असे मानले जात आहे. विराट कोहलीनेही दक्षिण आफ्रिका दौऱ्यात कसोटी कर्णधारपद सोडले होते. श्रीलंका मालिकेसाठी संघ निवडण्यापूर्वी कसोटी कर्णधाराची निवड केली जाईल आणि त्यानंतर संघासह नवीन कर्णधाराची घोषणा केली जाईल.

हे आहे भारत-श्रीलंका मालिकेचे वेळापत्रक

भारत आणि श्रीलंका यांच्यातील टी-20 मालिकेला 24 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. लखनौमध्ये पहिला सामना होणार आहे तर दुसरा व तिसरा सामना हा 26 व 27 फेब्रुवारीला धर्मशाला येथे होणार आहे. पहिली कसोटी मोहाली येथे 4 मार्चला तर दुसरी कसोटी गळुरू येथे 12 मार्चला खेळवली जाणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

Ranji Trophy 2026: बडोद्याकडून पराभवाचा झटका; मोहित रेडकर, दीपराज गावकर यांना गोव्याच्या रणजी संघातून डच्चू!

महिंद्राची नवी CNG SUV बाजारात; 9.99 लाखांपासून किंमत, दमदार लूकसह टाटा नेक्सॉन आणि ब्रेझाला देणार टक्कर

Ranji Trophy 2026: पिठिया-भार्गवच्या फिरकीपुढे गोव्याची शरणागती! बडोद्याचा डाव व 135 धावांनी दणदणीत विजय

SCROLL FOR NEXT