टीम इंडियाला नुकताच अंडर-19 विश्वचषक जिंकून देणारा राजवर्धन हंगरगेकर वयाच्या फसवणुकीच्या प्रकरणात अडकला आहे. वेगवान गोलंदाज असणाऱ्या हंगरगेकरवर वय कमी केल्याचा गंभीर आरोप होत असल्याची चर्चा आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हंगरगेकरचे खरे वय 21 वर्षे आहे, तरीही तो अंडर-19 वर्ल्ड कप (Under-19 World Cup) खेळला आहे. हंगरगेकरने या विश्वचषकामध्ये शानदार कामगिरी केली होती. टीम इंडियाने (Team India) इंग्लंडला हरवून वर्ल्ड कप आपल्या नावावर केला होता. मात्र हंगरगेकरवर वय लपवल्याचा गंभीर आरोप क्रीडा विभागाचे आयुक्त ओमप्रकाश बकोरिया (Omprakash Bakoria) यांनी केला आहे. त्यांनी बीसीसीआयला (BCCI) पत्र लिहिले असून त्यात त्यांनी हंगरगेकर विरोधात पुरावेही पाठवले आहेत. (Rajvardhan Hangargekar Is Embroiled In A Case Of Age Fraud)
मिळालेल्या माहितीनुसार, ओमप्रकाश बकोरिया यांनी बीसीसीआयला लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, धाराशिवचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) राहुल गुप्ता यांनी राजवर्धन हंगरगेकरच्या जन्मतारखेची पुष्टी केली आहे. त्यानुसार राज्यवर्धन हा धाराशिवमधील तेरणा पब्लिक स्कूलचा विद्यार्थी आहे. शाळेच्या नोंदीनुसार, इयत्ता 1 ली ते 7 वी पर्यंतची हंगरगेकरची जन्मतारीख 10 जानेवारी 2001 होती. मात्र, आठवीच्या वर्गात नवीन प्रवेश देताना मुख्याध्यापकांनी अनौपचारिकपणे राज्यवर्धनची जन्मतारीख बदलून 10 नोव्हेंबर 2002 केली. म्हणजेच 14 जानेवारी ते 5 फेब्रुवारी दरम्यान झालेल्या अंडर-19 क्रिकेट विश्वचषकाच्या वेळी राज्यवर्धन हंगरगेकरचे वय 21 वर्षे होते.
हंगरगेकर मोठ्या संकटात
बीसीसीआयच्या तपासात हंगरगेकर दोषी आढळल्यास त्याच्यावर बंदी घातली जाऊ शकते. 2017-18 मध्ये विश्वचषक जिंकणाऱ्या संघाचा सलामीवीर मनज्योत कालराही वयाच्या वादात अडकला होता. त्यानंतर त्याच्यावर एक वर्षाची बंदी घालण्यात आली होती. असे झाले तर हंगरगेकरला ही मोठा झटका असेल. एवढेच नाही तर या खेळाडूचा आयपीएल करारही रद्द होऊ शकतो.
चेन्नई सुपर किंग्ज हंगरगेकरांची हकालपट्टी करणार का?
आयपीएल 2022 च्या लिलावातही हंगरगेकरला मोठी रक्कम मिळाली आहे. हंगरगेकरला चेन्नई सुपर किंग्जने दीड कोटी रुपयांना विकत घेतले आहे. त्याला विकत घेण्यासाठी मुंबई इंडियन्सनेही (Mumbai Indians) मोठी बोली लावली होती पण यामध्ये चेन्नईने बाजी मारली होती. मात्र, आता या वादानंतर हंगरगेकरांचे काय होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. वयाच्या फसवणुकीप्रकरणी बीसीसीआय अनेकदा यापूर्वी कारवाया केल्या आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.