R Ashwin Dainik Gomantak
क्रीडा

ICC Test Rankings मध्ये मोठी उलथापालथ, 'हे' दोन खेळाडू मिळून ठरले नंबर-1 गोलंदाज!

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) नवीन कसोटी गोलंदाजी क्रमवारी (ICC Test Rankings) जाहीर केली आहे.

Manish Jadhav

Latest ICC Test Rankings: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) नवीन कसोटी गोलंदाजी क्रमवारी (ICC Test Rankings) जाहीर केली आहे.

या क्रमवारीत दोन खेळाडू मिळून नंबर-1 गोलंदाज बनले आहेत. या क्रमवारीत टीम इंडियाचा एक खेळाडू नंबर-1 कसोटी गोलंदाज बनला आहे, तर एक गोलंदाज इंग्लंड संघाचा आहे.

या दोन्ही गोलंदाजांचे आयसीसी कसोटी क्रमवारीत 859 गुण आहेत. विशेष म्हणजे, या दोन्ही खेळाडूंचे वय 35 पेक्षा जास्त आहे.

हे दोघे मिळून नंबर-1 गोलंदाज बनले

शेवटच्या कसोटी गोलंदाजी क्रमवारीत 36 वर्षीय आर अश्विनने इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनकडून अव्वल गोलंदाजाचा मुकुट हिसकावून घेतला होता. पण ताज्या क्रमवारीत हे दोन्ही खेळाडू 859 गुणांसह पहिल्या क्रमांकाचे गोलंदाज ठरले आहेत.

दुसरीकडे, आर अश्विन सध्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध (Australia) खेळल्या जाणाऱ्या कसोटी मालिकेत टीम इंडियाचा भाग आहे. 36 वर्षीय आर अश्विनने 2015 मध्ये पहिल्या क्रमांकाचा कसोटी गोलंदाज होण्याचा मान मिळवला होता. तेव्हापासून अनेक वेळा तो अव्वल स्थानावर परतला आहे.

आर अश्विनला मोठी संधी

आर अश्विनला ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरु असलेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी मालिकेत भारताच्या घरच्या मैदानावर उरलेल्या 1 कसोटी सामन्यात चमकदार कामगिरी करुन अव्वल स्थान कायम ठेवण्याची संधी आहे.

गोलंदाजीसोबतच अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत आर अश्विन दुसऱ्या क्रमांकावर कायम आहे. त्याचबरोबर, गोलंदाजांच्या यादीत रवींद्र जडेजा आठव्या स्थानावर कायम आहे. तर, जसप्रीत बुमराह सहाव्या स्थानावर पोहोचला आहे.

आर अश्विनचे ​​चमकदार आकडे

आर अश्विनने टीम इंडियासाठी (Team India) आतापर्यंत 91 कसोटी सामने खेळले आहेत. आर अश्विनने या सामन्यांमध्ये एकूण 467 विकेट घेतल्या आहेत.

तो भारताचा कसोटीतील सर्वात यशस्वी गोलंदाजांपैकी एक आहे. आर अश्विनने टीम इंडियासाठी 113 वनडे आणि 65 टी-20 सामनेही खेळले आहेत. त्याचबरोबर, आर अश्विनने वनडेमध्ये 151 आणि टी-20 मध्ये 72 विकेट्स घेतल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rishabh Pant: ऋषभ पंतने सोडले लखनऊ सुपर जायंट्सचे कर्णधारपद! अपयशाची स्वीकारली संपूर्ण जबाबदारी; पण संघात राहणार का?

NEET Paper Leak: 'फक्त बळीचा बकरा बनवून चालणार नाही, खऱ्या मास्टरमांइडला शोधा'; सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकार आणि NTA ला सक्त ताकीद

Budh Gochar 2026: गुंतवणुकीतून बंपर नफा आणि परदेश प्रवासाचा योग! बुधाचे गोचर ठरणार वरदान; 3 राशींवर होणार पैशांचा पाऊस

VIDEO: अंदाज चुकला की चपलेचा सणसणीत दणका! सोशल मीडियावर अतरंगी गेमचा व्हिडिओ व्हायरल; नेटकरी हसून हसून लोटपोट

स्मार्ट चष्म्यांच्या वापरातून फिक्सिंग... आयपीएल फायनलपूर्वी खळबळ, BCCI ॲक्शन मोडमध्ये! 'या' गोष्टीवर घातली बंदी

SCROLL FOR NEXT