ICC Test Rankings: 40 वर्षीय खेळाडूची ICC कसोटी क्रमवारीत शानदार कामगिरी, या वयातही...

Latest ICC Test Rankings: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) नवीन कसोटी गोलंदाजी क्रमवारी (ICC Test Rankings) जाहीर केली आहे.
James Anderson
James Anderson Dainik Gomantak
Published on
Updated on

Latest ICC Test Rankings: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) नवीन कसोटी गोलंदाजी क्रमवारी (ICC Test Rankings) जाहीर केली आहे. या क्रमवारीत 40 वर्षीय खेळाडू नंबर-1 कसोटी गोलंदाज ठरला आहे.

40 हे वय हे खेळाडूंसाठी असे वय असते, जेव्हा खेळाडू निवृत्तीचा विचार करतात किंवा निवृत्तीची घोषणा करतात, परंतु या खेळाडूने सर्वांना चकित करुन जागतिक क्रिकेटमध्ये खळबळ उडवून दिली आहे.

40 वर्षीय खेळाडूचा नंबर-1 गोलंदाज

इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन (James Anderson) आयसीसीच्या ताज्या कसोटी क्रमवारीत (ICC Test Rankings) जगातील पहिल्या क्रमांकाचा गोलंदाज ठरला आहे.

जेम्स अँडरसनने गेल्या आठवड्यात न्यूझीलंडविरुद्ध माउंट माउंगानुई येथे सात विकेट घेतल्याने इंग्लंडने 267 धावांनी सामना जिंकला. त्याने पॅट कमिन्सकडून अव्वल गोलंदाजाचा मुकुट हिरावून घेतला आहे. पॅट कमिन्स चार वर्षे कसोटीत नंबर वन गोलंदाज होता.

James Anderson
ICC Test Ranking: टीम इंडियाकडून अवघ्या तीन तासात ऑस्ट्रेलियाने हिरावला 'नंबर वन'चा ताज!

अश्विन आणि जडेजालाही फायदा झाला

ताज्या ICC कसोटी खेळाडूंच्या क्रमवारीत भारताच्या रविचंद्रन अश्विनला एका स्थानाचा फायदा झाला असून तो दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे, तर रवींद्र जडेजाने सात स्थानांचा फायदा मिळवून पहिल्या 10 गोलंदाजांमध्ये पोहोचला आहे.

दिल्लीतील ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत 10 बळी घेत जडेजाने नववे स्थान पटकावले. सप्टेंबर 2019 नंतर तो प्रथमच टॉप 10 मध्ये पोहोचला आहे.

दुखापतग्रस्त वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह हा टॉप 10 मध्ये आणखी एक भारतीय गोलंदाज आहे, जो पाचव्या स्थानावर आहे.

James Anderson
ICC Test Rankings मध्ये अश्विन-अय्यरची गगनभरारी, बांगलादेश मालिकेचा झाला फायदा

अक्षर पटेलनेही चमत्कार केला

उत्कृष्ट फलंदाजीमुळे अक्षर पटेल अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत पहिल्या पाचमध्ये सामील झाला आहे. कसोटी फलंदाजांच्या यादीत ऑस्ट्रेलियाचा मार्नस लॅबुशेन अव्वल स्थानावर आहे, त्यानंतर स्टीव्ह स्मिथ दुसऱ्या आणि पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम तिसऱ्या स्थानावर आहे.

कार अपघातानंतर अनिश्चित काळासाठी बाद झालेल्या भारताच्या ऋषभ पंतने सहावे स्थान कायम ठेवले आहे, तर कर्णधार रोहित शर्मानेही सातवे स्थान कायम ठेवले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com