goa Cricket

 

Dainik gomantak

क्रीडा

बार्देश ब्लास्टरवर मात करत रारारीरी महाकाल संघाने पटकावले विजेतेपद

गोवा अबकारी कॉपरेटिव सोसायटी लिग क्रिकेट टूर्नामेंट आयोजित स्पर्धेत एकूण पाच संघांनी भाग घेतला होता

दैनिक गोमन्तक

वास्को : रारारीरी महाकाल संघाने बार्देश ब्लास्टरवर मात करून अबकारी क्रिकेट (Cricket) लीगचे विजेतेपद पटकावले व आकर्षक चषकावर आपले नाव कोरले. गोवा (goa) अबकारी कॉपरेटिव सोसायटी लिग क्रिकेट टूर्नामेंट आयोजित स्पर्धेत एकूण पाच संघांनी भाग घेतला होता. यात क्रेझी बॉईज, मास्टर-ब्लास्टर, पॅंथर बॉईज, रारारीरी महाकाल व बार्देश ब्लास्टर आदींनी भाग घेतला होता.

फोंडा (Ponda) क्रीडा प्राधिकरण मैदानावर झालेल्या या लिगच्या अंतिम सामन्यात बार्देश ब्लास्टर ने प्रथम फलंदाजी करताना 4 षटकात 4 गडी गमावून 36 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल खेळताना रारारीरी महाकाली संघाने तीन चेंडू व 9 गडी राखून विजयी लक्ष गाठले व आकर्षक चषकावर आपले नाव कोरले. अंतिम सामन्यात सामनावीर पुरस्कार (Awards) रारारीरी महाकाल संघाच्या प्रसाद गावकर यांनी पटकावले. तर मालिकावीर पुरस्कार रारारिरी महाकाल संघाच्या निळू वेळीप यांने पटकावला.

रारारिरी महाकाल संघाला रोख 30000 हजार रुपये व आकर्षक चषक प्राप्त झाला. तर बार्देश ब्लास्टर संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. बक्षीस वितरण समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून अबकारी खात्याचे मुख्य आयुक्त संजीव गावस देसाई, तसेच सहाय्यक आयुक्त मंगलदास गावकर, मुकूंद गौस उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना बक्षिसे प्रदान करण्यात आली.रारारीरी महाकाल संघाचे व्यवस्थापक म्हणून अबकारी वास्को विभागाचे निरीक्षक मुकूंद गौस यांनी काम पाहिले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Nagarjuna At IFFI 2025: '..अजूनही देशात शिवा म्हणूनच हाक मारतात'! अभिनेते नागार्जुन यांचा दिलखुलास संवाद; उलगडला भावनिक प्रवास

मित्र मित्र गेले पोहायला, पाण्याचा अंदाज न आल्याने ओढवले संकट; दूधसागर नदीत बुडालेल्या 15 वर्षीय मुलाचा सापडला मृतदेह

Horoscope: प्रवास, संधी आणि नवीन दिशा! विद्यार्थ्यांसाठी दिवस उत्तम; व्यवसायिक लाभाचे संकेत

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर गोवा सरकारचा मोठा निर्णय; चार कनिष्ठ अधिकाऱ्यांची सेवा केली समाप्त!

Hong Kong Fire Video: हाँगकाँगमध्ये भीषण आग! 65 जणांचा मृत्यू, मृतांचा आकडा वाढण्याची भीती; धडकी भरवणारा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT