Ranji Trophy 2023-24: Know When and Where You Can See Semi-Final | Dainik Gomantak Marathi Cricket News
Ranji Trophy 2023-24: Know When and Where You Can See Semi-Final | Dainik Gomantak Marathi Cricket News PTI
क्रीडा

Ranji Trophy Semi-Final: 'या' चार संघांची सेमीफायनलमध्ये धडक, जाणून घ्या कधी अन् कुठे पाहाणार सामने

Pranali Kodre

Ranji Trophy 2023-24 Semi-Final Matches Schedule

भारतातील प्रतिष्ठीत देशांतर्गत स्पर्धा रणजी ट्रॉफीचा 2023-24 चा हंगाम आता अखेरच्या टप्प्यात आहे. आता २ मार्चपासून या हंगामातील उपांत्य फेरीला सुरुवात होणार आहे. या हंगामातील अंतिम चार संघ निश्चित झाले आहेत. विदर्भ, मध्य प्रदेश, मुंबई आणि तमिळनाडू या चार संघांनी उपांत्य फेरीत धडक मारली आहे.

उपांत्यपूर्व फेरीतील निकाल

23 ते 27 फेब्रुवारी दरम्यान रणजी ट्रॉफी 2023-24 हंगामातील उपांत्यपूर्व फेरी पार पडली. या फेरीत विदर्भाने कर्नाटकचा 127 धावांनी पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला.

तसेच मुंबई आणि बडोदा यांच्यातील सामना अनिर्णत राहिला, मात्र मुंबईने पहिल्या डावात घेतलेल्या आघाडीमुळे उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला आहे.

तमिळनाडूने सौराष्ट्रला उपांत्यपूर्व फेरीत एक डाव आणि 33 धावांनी पराभूत केले, तर मध्य प्रदेशने आंध्र प्रदेशविरुद्ध अवघ्या 4 धावांनी रोमांचक विजय मिळवत उपांत्य फेरी गाठली.

कुठे होणार उपांत्य फेरीतील सामने?

रणजी ट्रॉफी 2023-24 स्पर्धेतील उपांत्य फेरीतील सामने 2 ते 6 मार्च दरम्यान होणार आहे. या फेरीतील पहिला सामना विदर्भ विरुद्ध मध्य प्रदेश संघात नागपूरमधील विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर होणार आहे.

तसेच दुसरा सामना मुंबई विरुद्ध तमिळनाडू संघात मुंबईमधील बीकेसी ग्राऊंडवर होणार आहे. या दोन्ही सामन्यांना 2 मार्च रोजी सकाळी 9.30 वाजता सुरुवात होणार आहे.

या दोन्ही सामन्यातील विजेते संघ 10 ते 14 मार्चदरम्यान होणाऱ्या अंतिम सामन्यात खेळणार आहेत.

कुठे पाहाणार सामने?

रणजी ट्रॉफीच्या सामन्यांचे थेट प्रक्षेपण जिओ सिनेमा ऍप आणि वेबसाईटवर केले जात आहे.

रणजी ट्रॉफी 2023-24 स्पर्धेतील उपांत्य फेरीचे वेळापत्रक

2 ते 6 मार्च 2024

  • विदर्भ विरुद्ध मध्य प्रदेश - विदर्भ क्रिकेट असोसिएशन, नागपूर (वेळ - स. 9.30 वा.)

  • मुंबई विरुद्ध तमिळनाडू - बीकेसी ग्राऊंड, मुंबई (वेळ - स. 9.30 वा.)

अंतिम सामना - 10 ते 14 मार्च 2024

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

अज्ञात युवकांकडून म्हावळींगे गावात 'भू-सर्व्हेक्षण'; संतप्त गावकऱ्यांनी सर्व्हेचे काम रोखले, संशयित ताब्यात

Goa Todays Live Update: राहुल गांधींविरोधात फोंड्यात पोलिस तक्रार!

Goa Filmcity: गोवा फिल्मसिटीच्या कामासाठी सरकारी हालचाली सुरु, वाद पुन्हा उफाळण्याची शक्यता

Goa Dam Water Level: गोव्यात चार दिवस यलो अलर्ट; कोणत्या धरणात किती पाणीसाठी?

Panjim Police: रझिया गँगच्या दोघांना गोव्यातील हॉटेलमधून अटक; चोरीचे 3.75 लाखांचे दागिने जप्त

SCROLL FOR NEXT