Ranji Trophy Video: W,W,W,W... खेजरोलियाचा भीम पराक्रम! 4 चेंडूत 4 विकेट्स घेत मोठ्या विक्रमाला गवसणी

Kulwant Khejroliya 4 Wickets: कुलवंत खेजरोलियाने रणजी ट्रॉफीच्या सामन्यात चार चेंडूत चार विकेट्स घेण्याचा पराक्रम केला आहे.
Kulwant Khejroliya | 4 Wickets in 4 Balls
Kulwant Khejroliya | 4 Wickets in 4 BallsX/BCCI
Published on
Updated on

Kulwant Khejroliya 4 Wickets in 4 balls:

भारतात सध्या रणजी ट्रॉफी सुरू असून नुकतीच सहावी फेरी संपली. या फेरीत मध्य प्रदेशचा सामना बडोदाविरुद्ध होळकर क्रिकेट स्टेडिमयवर पार पडला. या सामन्यात मध्यप्रदेशने एक डाव आणि 52 धावांनी विजय मिळवला.

या विजयात 31 वर्षीय गोलंदाज कुलवंत खेजरोलियाने मोलाचा योगदान देत ऐतिहासिक कामगिरी नोंदवली. त्याने दुसऱ्या डावात 4 चेंडूत 4 विकेट्स घेतल्या.

या सामन्यात मध्यप्रदेशने पहिल्या डावात 454 धावा ठोकल्या होत्या. तसेच बडोद्याचा संघ मात्र पहिल्या डावात 132 धावांवरच सर्वबाद झाला. त्यामुळे मध्यप्रदेशने 322 धावांची आघाडी घेतल्याने बडोद्याला फॉलोऑन दिला.

Kulwant Khejroliya | 4 Wickets in 4 Balls
Ranji Trophy 2024: पृथ्वी शॉ ची अफलातून खेळी! फर्स्ट क्लास क्रिकेट कारकिर्दीतील ठोकले 13 वे शतक

त्यानंतर दुसऱ्या डावात बडोदा संघ फलंदाजीला उतरला असताना त्यांचा डाव शाश्वत रावतने शतक करत सावरला होता. मात्र 95 व्या षटकात गोलंदाजी करताना खेजरोलियाने कहर केला. त्याने या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर 105 धावांवर खेळणाऱ्या शाश्वतला पायचीत केले.

त्यानंतर पुढच्याच तीन चेंडूवर त्याने महेश पिठीया, भार्गव भट आणि आकाश महाराज सिंग यांना लागोपाठ बाद करत डबल हॅट्रिक (चार चेंडूत चार विकेट्स) घेतली.

खेजरोलिया प्रथम श्रेणी सामन्यात चार चेंडूत चार विकेट्स घेणारा भारताचा केवळ तिसरा खेळाडू ठरला आहे. यापूर्वी 1988 साली दिल्लीच्या शंकर सैनी यांनी, तर 2018 मध्ये जम्मू-काश्मीरच्या मोहम्मद मुदाशिर यांनी असा पराक्रम केला आहे.

Kulwant Khejroliya | 4 Wickets in 4 Balls
Ranji Trophy: खराब कामगिरीचा अर्जुन तेंडुलकरला फटका; रेल्वेविरुद्धच्या सामन्यासाठी विश्रांती

तसेच मुदाशिर आणि खेजरोलिया हे दोनच असे खेळाडू आहेत, ज्यांनी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये डबल हॅट्रिक आणि लिस्ट ए क्रिकेटमध्ये हॅट्रिक घेतली आहे. त्याचबरोबर मध्यप्रदेशकडून डबल हॅट्रिक घेणारा खेजरोलिया पहिलाच गोलंदाज आहे.

तसेच खेजरोलियाने नंतर या सामन्यात 99 व्या षटकात अतित शेठलाही बाद करत प्रथम श्रेणी कारकिर्दीत पहिल्यांदाच पाच विकेट्स घेण्याची कामगिरी केली. तसेच या विकेटसह बडोद्याचा दुसरा डाव 270 धावांवर संपला.

त्यामुळे मध्यप्रदेशने मोठ्या विजयाची नोंद केली. या विजयामुळे आता मध्यप्रदेश 6 फेऱ्यांनंतर एलिट ग्रुप डीमध्ये 26 गुणांसह अव्वल क्रमांकावर आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com