Ramkumar Ramanathan Instagram/maharashtraopen
क्रीडा

Davis Cup: तब्बल 60 वर्षांनी भारतीय टेनिस टीम करणारा पाकिस्तानचा दौरा, 'हा' खेळाडू करणार नेतृत्व

Pranali Kodre

Ramkumar Ramanathan to lead India in the Davis Cup 2024 World Group I play-off tie against Pakistan:

ऑल इंडिया टेनिस असोसिएशनने (AITA) पुढीलवर्षी पाकिस्तानविरुद्ध होणाऱ्या डेविस कपमधील सामन्यांसाठी भारतीय संघाची घोषणा केली होती. त्यामुळे आता भारतीय टेनिस संघ पाकिस्तान दौऱ्यावर जाणार हे निश्चित झाले आहे.

AITA ने आयटीएफकडे हे सामने सुरक्षेच्या कारणाने दुसरीकडे हालवण्यासाठी विनंती केली होती. मात्र, ही मागणी आयटीएफने फेटाळली आहे. त्यामुळे भारतीय संघ पाकिस्तानला जाणार असल्याचे म्हटले जात आहे.

विशेष म्हणजे जर भारतीय संघ पाकिस्तान दौऱ्यावर गेला, तर 1964 नंतर म्हणजे तब्बल 60 वर्षांनंतर भारताचा डेविस कपमधील हा पहिला पाकिस्तान दौरा असेल. 1964 साली भारतीय संघाने पाकिस्तानला त्यांच्या भूमीत 4-0 अशा फरकाने पराभूत केले होते. दरम्यान, डेविस कपमध्ये भारताने कधीही पाकिस्तानविरुद्ध पराभव स्विकारलेला नाही.

दरम्यान, भारताला पाकिस्तानविरुद्ध पाकिस्तानमध्ये वर्ल्ड ग्रुप 1 प्लेऑफचे सामने खेळायचे आहेत. हे सामने 3 आणि 4 फेब्रुवारीला होणार आहेत. या सामन्यांसाठी भारताचे नेतृत्व अनुभवी रामकुमार रामनाथन करेल. त्याच्यासह या संघात एन श्रीराम बालाजी, युकी भांबरी, निकी पोनाचा आणि साकेत मायनेनी यांचा समावेश आहे.

यातील रामकुमार आणि साकेत हे एकेरीचे खेळाडू असून बाकी तिघे दुहेरी खेळणारे खेळाडू आहेत. या संघाचे कॅप्टन रोहित राजपाल असतील, तर प्रशिक्षक झिशन अली असतील. दरम्यान रोहित हे भांबरी आणि बालाजीला एकेरीत खेळण्यासाठी सांगू शकतात. या संघात दिग्विजय प्रताप सिंग याची राखीव खेळाडू म्हणून निवड झाली आहे.

नागल आणि मुकुंदने घेतली माघार

दरम्यान, या सामन्यांमधून सुमीत नागल आणि शशी कुमार मुकुंद या भारताचा स्टार टेनिसपटूंनी या सामन्यातून यापूर्वीच माघार घेतली होती. याबद्दल त्यांनी AITA ला कळवले होते.

AITA चे सरचिटणीस अनिल धुपवर यांनी पाकिस्तानला जाण्यासाठी भारतीय सरकारकडून परवानगी मिळेल अशी शक्यता व्यक्त केली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

Tourist in Goa: गोव्यात धार्मिक तणाव, पर्यटकांची पायपीट तर शाळकरी मुलांचे हाल!!

गोव्यातील पोर्तुगीजकालीन पूलांचे होणार 'स्ट्रक्चरल ऑडिट'; सावंत सरकारचा निर्णय

Goa Government Schools: ...गेल्या 5 वर्षांत ट्रेंड बदलला, शासनाचे सरकारी शाळांना प्राधान्य; CM सावंत

Goa Today's News Live: गोव्यातील सर्व धर्मियांमध्ये संत फ्रान्सिस झेवियर यांचा DNA; मंत्री सिक्वेरा

SCROLL FOR NEXT