Tennis Tournament पणजी जिमखान्याने गोवा राज्य टेनिस संघटनेच्या सहकार्याने घेतलेल्या टीएनएस खुल्या टेनिस स्पर्धेत तिथी भूमकर व दर्श पै यांनी वर्चस्व राखले. त्यांनी दुहेरी किताबाचा मान मिळवताना अनुक्रमे 14 आणि 18 वर्षांखालील मुली व मुलांत विजेतेपद पटकावले.
स्पर्धा कांपाल येथील पणजी जिमखान्याच्या टेनिस कोर्टवर झाली. राजेंद्र गुदिन्हो याने धडाका राखताना पुरुष दुहेरी, मिश्र दुहेरी आणि 45 वर्षांवरील व्हेटरन्स दुहेरीत बाजी मारली.
जिवलग मैत्रीणी असलेल्या तिथी आणि विधी नाईक यांच्यात 14 वर्षांखालील आणि 18 वर्षांखालील मुलींच्या एकेरीत विजेतेपदासाठी झुंज झाली. तिथीने दोन्ही अंतिम लढतीत वरचष्मा राखताना अनुक्रमे 4-0, 4-0 आणि 6-4, 6-3 फरकाने विजय प्राप्त केला.
दर्श याने 14 वर्षांखालील मुलांच्या एकेरीतील अंतिम लढतीत व्हिवान अगरवाल याच्यावर 4-1, 4-0 असा पराभव केला, तर 18 वर्षांखालील एकेरीत गौरांग फुटणकर याच्यावर 6-3-, 6-3 अशी मात केली.
व्हेटरन्स गटात मानो छाब्रा याने 45 वर्षांवरील पुरुष एकेरीत, बुलू व मानो यांनी पुरुष दुहेरीत, 55 वर्षांवरील व्हेटरन्स दुहेरीत डेव्हिड व संजय जोडीने विजेतेपद मिळविले.
इतर प्रमुख अंतिम निकाल:-
महिला एकेरी: मान्युएला गोम्स वि. वि. तान्या शेलियाझिन्स्का-काल्देरा 6-1, 6-0,
पुरुष एकेरी: तेजस शेवडे वि. वि. सूरज सदाना 6-0, 6-1.
पुरुष दुहेरी: राजेंद्र गुदिन्हो व रिचर्ड लॉकहार्ट स्मिथ वि. वि. सचिन दुकळे व राजाराम कुंडईकर 5-7, 6-4 (सामना सोडला),
मिश्र दुहेरी: राजेंद्र गुदिन्हो व तान्या शेलियाझिन्स्का-काल्देरा वि. वि. संतोष गोरावर व अर्चना देसाई 4-0, 4-2
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.