Rameez Raja Dainik Gomantak
क्रीडा

पाकिस्तान क्रिकेट बोर्ड पुन्हा वादाच्या भोवऱ्यात, PCB प्रमुख रमीझ राजा बनले 'हुकुमशाह'

रमीझ राजा (Rameez Raja) यांनी कराची टेस्टमधील कॉमेंट्री पॅनलला खेळपट्टीबद्दल बोलण्यास मनाई केली आहे.

दैनिक गोमन्तक

पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील 3 कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना कराचीमध्ये खेळवण्यात येत आहे. रावळपिंडीनंतर आता कराचीच्या खेळपट्टीचा मूडही क्रिकेटपंडितांना बुचकाळ्यात टाकत आहे. रावळपिंडी कसोटीनंतर खेळपट्टीवरुन पाकिस्तानला (Pakistan) जगभरातून फटकारले जात आहे. अनेक प्रश्नही उपस्थित केले जात आहेत. त्यामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला उत्तर देणे कठीण झाले आहे. आता कराचीच्या (Karachi) खेळपट्टीचा मूडही लोकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू बनत चालला आहे, अशा परिस्थितीत पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (PCB) अध्यक्ष रमीझ राजा (Rameez Raja) एक्शनमध्ये आले आहेत. (Rameez Raja has barred the commentary panel in the Karachi Test from talking about the pitch)

मीडिया रिपोर्ट्सनुसार, रमीझ राजा यांनी कराची टेस्टमधील कॉमेंट्री पॅनलला खेळपट्टीबद्दल बोलण्यास मनाई केली आहे. मात्र दुसरीकडे कसोटी सामना सुरु असताना खेळपट्टीची चर्चा होणार नाही हे कसं चालेलं.

रमीझ राजांनी खेळपट्टीबद्दल बोलण्यास बंदी घातली!

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे प्रमुख रमीझ राजा यांनी कराचीच्या कॉमेंट्री बॉक्समधील पॅनलला खेळपट्टीबद्दल बोलण्यास बंदी घातली आहे. तर, जिओ न्यूजच्या पत्रकाराच्या म्हणण्यानुसार, त्यांनी रावळपिंडीतही हीच बंदी घातली होती. तिथे त्यांनी कॉमेंट्री करणाऱ्या पॅनेलला खेळपट्टीसंबंधी चर्चा बंदी घातली होती. रावळपिंडीची खेळपट्टी कसोटी सामन्यासाठी योग्य नव्हती. याची अवघ्या क्रिकेट जगाला कल्पना आली.

रावळपिंडीनंतर कराचीची खेळपट्टीही वादाच्या भोवऱ्यात!

कराचीच्या खेळपट्टीवर ऑस्ट्रेलियाने(Australia) 9 विकेट्सवर 556 धावा करुन पहिला डाव घोषित केला होता. तिसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात डाव घोषित करण्याचे काम त्यांनी केले, त्याबाबत ब्रॅड हॉगन यांनी प्रश्न उपस्थित केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Calangute: दारुच्या नशेत टाईट पर्यटकाचा कळंगुटमध्ये राडा; नग्न होऊन रस्त्यात झोपला, टॅक्सीवर उभारला

Rashi Bhavishya 23 November 2024: नोकरीत बढतीची संधी अन् बेरोजगारांनाही दिलासा... 'या' दोन राशींच्या लोकांचा विशेष दिवस!

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

SCROLL FOR NEXT