आयपीएल 2022 (IPL 2022) चा हंगाम काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. जसजशी लीग जवळ येत आहे, तसतशी चाहत्यांची क्रेझही वाढत आहे. यावेळी दोन नवीन संघ वाढल्यामुळे हा थरार आणखीच वाढला आहे. याशिवाय अनेक खेळाडूंच्या जर्सीमध्येही बदल झाला आहे. परंतु या सगळ्यात मोठी बातमी म्हणजे 26 खेळाडू या लीगला मुकणार आहेत. यामध्ये सर्वात जास्त नुकसान दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) आणि लखनऊ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants) संघांचे होणार आहे. (26 players will be absent for the first week of IPL 2022)
दरम्यान, आयपीएल 2022 (IPL 2022) च्या हंगामात 26 खेळाडू या स्पर्धेच्या पहिल्या आठवड्यातच खेळताना दिसणार नाहीत. म्हणजेच, दुसऱ्या आठवड्यापासून ते लीगमध्ये सामील होण्याची शक्यता आहे. याचा अर्थ फक्त पहिल्या आठवड्यासाठी फ्रँचायझींना त्या 26 खेळाडूंची सेवा मिळू शकणार नाही. काही खेळाडू राष्ट्रीय बांधिलकीमुळे, काही वैयक्तिक कारणांमुळे खेळाडू उपस्थित राहणार नाहीत.
दिल्ली आणि लखनऊचे 5-5 खेळाडू
दरम्यान, 26 खेळाडू IPL 2022 च्या पहिल्या आठवड्यात खेळताना दिसणार नाहीत. त्यापैकी दिल्ली कॅपिटल्स आणि लखनऊ फ्रँचायझींचे सर्वाधिक खेळाडू आहेत. या दोन्ही संघातील 5-5 खेळाडू आयपीएल 2022 पासून पहिल्या आठवड्यात व्यस्त असतील.
दिल्ली कॅपिटल्ससाठी डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, एनरिक नोरखिया (Injury), मुस्तफिझूर रहमान आणि लुंगी एनगिडी अनुपस्थित राहत असल्यामुळे मोठा धक्का मानला जात आहे. लखनऊ सुपर जायंट्ससाठी मार्कस स्टॉइनिस, जेसन होल्डर, काइल मायर्स, मार्क वुड आणि क्विंटन डी कॉक यांच्या नावांचा समावेश आहे. यामध्ये मार्क वुडनेही दुखापतीमुळे लीगमधून माघार घेतली आहे.
हे खेळाडूही अनुपस्थित!
याशिवाय जॉनी बेअरस्टो, कागिसो रबाडा आणि नॅथन एलिस पंजाब किंग्जकडून दिसणार नाहीत. आरसीबीकडून ग्लेन मॅक्सवेल, जोस हेझलवूड आणि बेहरेनडॉर्फ. सनरायझर्स हैदराबादकडून एडन मार्कराम, सॅन अॅबॉट आणि मार्को यान्सन. राजस्थान रॉयल्सकडून रासी व्हॅन डेर दुस्से. केकेआरकडून अॅरॉन फिंच आणि पॅट कमिन्स. सीएसकेकडून ड्वेन प्रिटोरियसशिवाय मुंबई इंडियन्सच्या जोफ्रा आर्चरच्या नावाचा समावेश असणार आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.