Ram Mandir | Sports Person ANI
क्रीडा

Ram Mandir: उत्सुकता प्रभू रामाच्या दर्शनाची! सचिन, सायना, मितालीसह क्रीडापटूंची मांदियाळी अयोध्येत, पाहा Video

Ram Mandir Ayodhya: सोमवारी अयोध्येतील राम मंदिरात रामलल्लाची प्राण प्रतिष्ठा केली जाणार आहे. यासाठी अनेक भारतीय क्रीडापटूंनी अयोध्येत हजेरी लावली आहे.

Pranali Kodre

Ram Mandir Inauguration Ayodhya:

भारतभरात सोमवारी उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. कारण सोमवारी अयोध्येतील राम मंदिरात रामलल्लाची प्राण प्रतिष्ठा केली जाणार आहे. यासाठी मोठा सोहळा आयोजित करण्यात आला असून याबद्दल संपूर्ण देशभरात उत्साह साजरा केला जात आहे.

या सोहळ्याचे निमंत्रण विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांना देण्यात आले आहे. यामध्ये भारताच्या अनेक खेळाडूंचाही समावेश आहे.

आत्तापर्यंत मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर, विराट कोहली, एमएस धोनी, नीरज चोप्रा, पीटी उषा, मिताली राज, सायना नेहवाल, पीव्ही सिंधू, आर अश्विन यांच्यासह अनेक खेळाडूंना अयोध्येतील या सोहळ्यासाठी निमंत्रण देण्यात आले आहे.

त्याचमुळे अनेक खेळाडू सध्या अयोध्येत पोहचले आहेत. भारताचा माजी क्रिकेटपटू वेंकटेश प्रसाद आणि अनिल कुंबळे हे एक दिवस आधीच अयोध्येत पोहोचले होते. प्रसादने सोशल मीडियावर फोटोही शेअर केले होते.

तसेच कुंबळेने म्हटले आहे की 'हा शानदार सोहळा आहे. हा दैवी सोहळा आहे. या सोहळ्याचा भाग झाल्याचा आनंद आहे. हे ऐतिहास आहे. रामलल्लाचा आशिर्वाद घेण्यासाठी उत्सुक आहे.'

याशिवाय देखील मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरही अयोध्येत पोहचला असून विराट कोहलीचा ताफा अयोध्येत पोहचल्याचे समजत आहे.

त्याचबरोबर भारताची बॅडमिंटनपटू सायना नेहवाल देखील अयोध्येत पोहचली आहे. तिने म्हटले आहे की 'मला वाटते आपल्या सर्वांसाठी हा मोठा दिवस आहे. मला इथे उपस्थित राहण्याची संधी मिळाल्याबद्दल मी भाग्यवान आहे. आपल्याला प्रभू रामाचे दर्शन मिळणार आहे. त्या क्षणाची आपण वाटत पाहत आहोत. मी मला किती आनंद झाला आहे, हे शब्दात सांगू शकत नाही. '

अयोध्येत पोहचलेली मिताली राज म्हणाली, 'जेव्हा एखाद्या धार्मिक स्थळी असल्यानंतर ज्या भावना असतात, तशाच भावना माझ्या आहेत. बराच काळापासून आपण याची प्रतिक्षा करत होतो. हा एक सोहळा आहे आणि आम्ही सर्व हा सोहळ्याचा भाग असल्याचा आनंद आहे.'

याव्यतिरिक्तही अनेक खेळाडू सध्या अयोध्येत पोहचले आहेत. त्यांचेही व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहेत. तसेच केवळ खेळाडूच नाही, तर अनेक सिनेस्टारही अयोध्येत दाखल झाले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून गंडा घालणाऱ्या 'श्रुती'ला दिलासा; फोंडा कोर्टाकडून जामीन!

India Bike Week 2024: चित्तथरारक स्टंट, म्युझिक आणि बरंच काही...; गोव्यातील बाईक इव्हेंटच्या Date, Venue जाणून घ्या

Tribute to the Legends मिरामार किनारी सुदर्शन पटनाईक यांनी साकारले सिने जगतातील दिग्गजांचे Sand Art, पाहा फोटो

Goa Today's News Live: नैसर्गिक मृत्यू की हत्या; पारोडा-केपे येथे घरात आढळला महिलेचा मृतदेह

Goa Cyber Crime: गोवा पोलिसांनी दिला दणका, सायबर गुन्हेगारीत गुंतलेले तब्बल 152 मोबाईल नंबर 'ब्लॉक'

SCROLL FOR NEXT