Ayodhya Ram Mandir: राज्यातील घराघरांत आज दीपोत्सव; मंदिरे सजली, ठिकठिकाणी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

Ayodhya Ram Mandir: मंदिरे सजली : ठिकठिकाणी धार्मिक कार्यक्रम; जागोजागी श्रीरामाच्या प्रतिकृती
Ayodhya Ram Mandir
Ayodhya Ram MandirDainik Gomantak

Ayodhya Ram Mandir: अयोध्येतील श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त राज्यात दिवसभर भक्तिमय वातावरण राहणार आहे. सायंकाळी सर्वत्र प्रज्वलित केल्या जाणाऱ्या पणत्यांमुळे अवघे नभोमंडल तेजोमय होणार आहे. राज्यातील सर्व देवस्थानांमध्ये सकाळपासून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. एकूणच संपूर्ण राज्याचा माहोल राममय झाला आहे.

Ayodhya Ram Mandir
Goan Special Recipe: अनेक भाज्यांची एक अनोखी स्वाद देणारा गोव्याचा पारंपारिक पदार्थ 'खतखते'

अयोध्येत प्रत्यक्ष श्री रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होईल, त्यावेळी ठिकठिकाणी श्रीराम नामाचा जप करण्यात येणार आहे. शिवाय काही महत्त्वाच्या ठिकाणी अयोध्येतील मूर्ती प्राणप्रतिष्ठापना कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. राज्यात विविध देवदेवतांची मंदिरे आहेत, त्यापैकी बहुसंख्य मंदिरांमध्ये विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित केले आहेत. ठिकठिकाणी होणाऱ्या दीपोत्सवांमुळे राज्यात दिवाळीसारखे वातावरण असणार आहे.

सांताक्रूझ येथील युवकांनी वाहनांतून श्रीरामाचा जयघोष करणारी फेरी काढली. वाहनांवर श्रीरामांचे ध्वज आणि काहींनी भगवी वस्रे परिधान केल्याने संपूर्ण परिसरच भगवामय झाला होता. सांताक्रूझ, पणजी, ताळगाव या भागातून ही मिरवणूक निघाली. पणजी पोलिस स्थानकाचे निरीक्षक निखिल पालेकर यांनी ही मिरवणूक व्यवस्थित पार पडावी, यासाठी ठिकठिकाणी कडक बंदोबस्त ठेवला होता. राज्यात ठिकठिकाणी श्रीरामाच्या प्रतिमा असलेले फलक उभारून आणि भगवे झेंडे लावून राममय वातावरणाची निर्मिती केल्याचे दिसून आले.

भाटलेत मिरवणुकीचे जल्लोषात स्वागत

सांताक्रूझच्या युवकांनी श्रीरामाच्या प्रतिमा असलेले झेंडे दुचाकीला लावून तिसवाडी तालुक्याच्या काही भागांत श्रीरामाचा जयघोष करीत सायंकाळी फेरी काढली. भाटले येथील राम मंदिराजवळ या मिरवणुकीचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.

सत्तरीतील दिवाळीकडे लक्ष

सत्तरीत सोमवारी दिवाळी साजरी करणार असल्याचे आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे यांनी काही दिवसांपूर्वीच जाहीर केले होते. त्यांच्या या कार्याला त्यांच्या पत्नी आमदार दिव्या राणे यांनीही हातभार लावला असल्याने सत्तरीतील दिवाळी खरोखरच कशी असेल, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com