Ram Mandir: राम लल्लाचे 'नेक्स्ट फ्रेंड्स', जे लढले आयोध्येची न्यायलयीन लढाई, वाचा काय आहे संपूर्ण प्रकरण

भारतीय कायद्यानुसार, देवता ही एक स्वतंत्र अस्तित्व आहे आणि एखाद्या फर्म किंवा ट्रस्टप्रमाणे ती स्वतःची केस लढू शकते. राम लल्ला एक शाश्वत अल्पवयीन आहे आणि न्यायलयात स्वतःचे प्रतिनिधित्व करण्यासाठी त्याला 'नेक्स्ट फ्रेंड' आवश्यक आहे.
Ram Lalla's 'Next Friends', Who Fought Ayodhya's Court Battle, Read What Is The Complete Case.
Ram Lalla's 'Next Friends', Who Fought Ayodhya's Court Battle, Read What Is The Complete Case.

Ram Lalla's 'Next Friends', Who Fought Ayodhya's Court Battle:

अयोध्या नगरी राम मंदिर अभिषेक सोहळ्याची तयारी करत असताना, 1989 पासून न्यायालयांमध्ये प्रभू श्रीरामांचे प्रतिनिधित्व करणाऱ्यांची आज अनेकजन आठवण काढत त्यांच्या कार्याचे पुन्हा एकदा कौतुक करत आहेत.

प्रभू श्रीरामांची न्यायालयामध्ये बाजू मांडणाऱ्यांमध्ये पहिले होते देवकी नंदन अग्रवाल, जे उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश होते. पुढे त्यांची विश्व हिंदू परिषदेचे उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली. राम लल्ला लहान असल्याने त्यांचा मित्र या नात्याने त्यांच्या बाजूने लढेन, असे अग्रवाल म्हणायचे.

अग्रवाल यांच्या मृत्यूनंतर बनारस हिंदू विद्यापीठातील प्राध्यापक ठाकूर प्रसाद वर्मा यांनी ती जबाबदारी स्वीकारली. आणि यामधील तिसरे म्हणजे त्रिलोकी नाथ पांडे ज्यांनी 2010 मध्ये राम लल्लासाठी न्यायालयीन लढाई लढली.

जेव्हा सर्वोच्च न्यायालयाने 2019 मध्ये घोषित केले की, राम लल्ला विराजमान हे अयोध्येतील वादग्रस्त जमिनीचे मालक आहेत, तेव्हा त्यांचे 'पुढचे मित्र' त्रिलोकी नाथ पांडे आनंदित झाले. निकाल आला तेव्हा वयाच्या 75 व्या वर्षी पांडे यांनी राम लल्लासाठी ठेवलेला 'निर्जल' उपोषण सोडले.

प्रभू श्रीरामांचा दुसरा वनवास आता संपला आहे. ते आता ताडपत्रीतून एका भव्य मंदिरात जाण्यास तयार आहेत. ही रामलल्ला विराजमानची विजयी गोष्ट आहे, पण सर्वात चांगली गोष्ट म्हणजे कोणीही हरले नाही. त्यावेळी पांडे यांनी टाइम्स ऑफ इंडियाच्या वार्ताहराला सांगितले होते. सप्टेंबर 2021 मध्ये हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला.

"अयोध्यानगरी आता बहुप्रतिक्षित अभिषेक सोहळ्यासाठी सज्ज होत असताना, आपण राम लल्लाचे ‘पुढचे मित्र’ गमावत आहोत. अयोध्या निकालाच्या वेळी पांडे यांच्या आनंदाला पारावार नव्हता. त्याचा चेहरा आनंदाने उजळला होता, तर त्याचे डोळे अश्रूंनी भरले होते,” असे महंत गिरीशपती त्रिपाठी म्हणाले. ते आता अयोध्येचे महापौर आहेत.

काय आहे ‘नेक्स्ट फ्रेंड’ संकल्पना?

हे लक्षात घेण्यासारखे आहे की, भारतीय कायद्यानुसार, देवता ही एक स्वतंत्र अस्तित्व आहे आणि एखाद्या फर्म किंवा ट्रस्टप्रमाणे ती स्वतःची केस लढू शकते. देवता (राम लल्ला विराजमान) एक शाश्वत अल्पवयीन आहे आणि कोर्टात स्वतःचे प्रतिनिधित्व करण्यासाठी त्याला 'नेक्स्ट फ्रेंड' आवश्यक आहे.

‘नेक्स्ट फ्रेंड’ ही संकल्पना देवकी नंदन अग्रवाल यांनी मांडली होती, जे पुढे अलाहाबाद उच्च न्यायालयात न्यायाधीश झाले होते. निवृत्तीनंतर, त्यांनी कागदपत्रांवर विस्तृत संशोधन केले आणि 1989 मध्ये अलाहाबाद उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आणि दावा केला की ही जमीन राम लल्लाची आहे आणि ते त्यांचे 'नेक्स्ट फ्रेंड' आहेत. संगम शहरातील रहिवासी असलेले अग्रवाल 1996 पर्यंत राम लल्लाचे प्रतिनिधित्व करत राहिले.

अग्रवाल यांच्यानंतर, इतिहासकार ठाकूर प्रसाद वर्मा (1996-2009), ज्यांनी बनारस हिंदू विद्यापीठात प्राध्यापक म्हणून काम केले, त्यांनी न्यायालयांमध्ये राम लल्लाचे प्रतिनिधित्व केले.

इतिहास आणि पुरातत्व शास्त्राच्या ज्ञानाचाही उपयोग करून त्यांनी खटला पुढे नेला. नंतर, त्यांच्या वयामुळे आणि बिघडलेल्या प्रकृतीमुळे, त्यांनी 2008 मध्ये माघार घेतली आणि VHP पदाधिकारी त्रिलोकी नाथ पांडे यांनी राम लल्लाचे 'नेक्स्ट फ्रेंड' म्हणून पदभार स्वीकारला. आणि राम लल्लाच्या न्यायालयीन विजयपर्यंत ते लढत राहिले.

आता आयोध्येत होणार राम मंदिर अभिषेक समारंभ हा ‘नेक्स्ट फ्रेंड्स'च्या कुटुंबातील सदस्यांसाठी अभिमानास्पद आणि नॉस्टॅल्जिक क्षण असेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com