Virat Kohli X/BCCI
क्रीडा

IND vs ENG: टीम इंडियात विराटची जागा घेणार RCB चा 'हा' शिलेदार? इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेपूर्वी संघात सामील

Pranali Kodre

Virat Kohli Replacement in India Test squad for England series

भारत विरुद्ध इंग्लंड संघात 25 जानेवारीपासून पाच सामन्यांची कसोटी मालिका सुरु होत आहे. मात्र या मालिकेआधी भारतीय संघाला मोठा धक्का बसला. भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली काही वैयक्तिक कारणामुळे या मालिकेतील पहिल्या दोन कसोटी सामन्यांमधून बाहेर झाला आहे.

त्यामुळे विराटच्या जागेवर बदली खेळाडू म्हणून कोणाला संधी मिळणार अशी चर्चा गेल्या दोन दिवसांपासून होती. मात्र आता असे समोर येत आहे की 30 वर्षीय रजत पाटीदारला विराटच्या जागेवर संधी मिळाली आहे.

क्रिकबझने दिलेल्या वृत्तानुसार रजत हैदराबादला मंगळवारी (23 जानेवारी) पार पडलेल्या बीसीसीआयच्या पुरस्कार सोहळ्यातही भारतीय संघासह उपस्थित होता.

भारतीय निवड समितीने यापूर्वी पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी संघाची निवड केली होती. त्याच विराटचाही समावेश होता. मात्र काही दिवसांनी विराटने काही वैयक्तिक कारणाने बीसीसीआयकडे सुटीची मागणी केली.

त्यानंतर आता निवड समितीने रजतला संघात सामील केले आहे. विशेष म्हणजे रजत आणि विराट आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाकडून एकत्र खेळतात.

दरम्यान, याआधी चर्चा होती की कदाचीत विराटच्या जागेवर चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे किंवा सर्फराज खान यांना संधी दिली जाऊ शकते. मात्र, आता रजत संघात सामील झाल्यानंतर या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

रजत सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे. त्याने सध्या भारत दौऱ्यावर असलेल्या इंग्लंड लायन्स संघाविरुद्ध (इंग्लंड अ संघाविरुद्ध) भारतीय अ संघाकडून खेळताना चांगली कामगिरी केली आहे. त्याने अहमदाबादला झालेल्या चारदिवसीय सामन्यात इंग्लंड लायन्सविरुद्ध १५१ धावांची खेळी केली होती.

तसेच त्याआधी इंग्लंड लायन्सविरुद्धच सराव सामन्यातही रजतने 111 धावांनी खेळी केली होती. तो गेल्यावर्षाच्या अखेरीस दक्षिण आफ्रिका दौऱ्यात भारतीय अ संघाकडून खेळला होता. त्याचा सध्याचा फॉर्म चांगला असून तो मधल्या फळीत चांगले योगदान देऊ शकतो, या गोष्टी लक्षात घेऊन कदाचीत त्याला संधी दिली गेली असू शकते.

दरम्यान, मीडियातील काही रिपोर्ट्सनुसार अशीही माहिती समोर आली आहे की बीसीसीआयने इंग्लंड लायन्सविरुद्धच्या दुसऱ्या चार दिवसीय सामन्यासाठी भारतीय अ संघात जी रिंकू सिंगची निवड केली आहे. ही निवड पाटीदारचा बदली खेळाडू म्हणून झाली आहे.

असा आहे इंग्लंडचा भारत दौरा

भारताचा इंग्लंडविरुद्धचा पहिला कसोटी सामना हैदराबादला 25 जानेवारीपासून खेळवला जाणार आहे. त्यानंतर 2 फेब्रुवारीपासून विशाखापट्टणमला दुसरा कसोटी सामना होणार आहे, तर तिसरा सामना 15 फेब्रुवारीला राजकोटला सुरु होईल.

तसेच 23 फेब्रुवारीपासून रांचीला चौथा सामना सुरू होणार आहे, तर पाचव्या सामन्याची सुरुवात 7 मार्चपासून धरमशाला येथे होईल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's News Live: DNA चाचणी मागणीचा वाद; कोलवा सर्कल ब्लॉक, वाहतूक वळवली!

गोव्यात गेल्या दहा वर्षात सर्वाधिक 'वृक्षसंहार', शेतजमिनींचादेखील ऱ्हास; केंद्रीय अहवालातून खुलासा!

Margaon Municipality: बेकायदेशीर व्यवसाय करणाऱ्यांविरोधात धडक कारवाई करा; महेश अमोणकरांची मागणी

Mhadei Water Dispute: म्हादईवर वक्रदृष्टी कायम! कर्नाटक सरकारच्या 'करनाटकी वृत्ती'वर पर्यावरणप्रेमी केरकर स्पष्टच बोलले

St. Francis Xavier DNA चाचणी मागणीने गोव्यात धार्मिक तेढ; हिंदुवादी संघटना, ख्रिस्ती समाजाचे राज्यभर मोर्चे, वातावरण तंग

SCROLL FOR NEXT