Yashasvi Jaiswal
Yashasvi Jaiswal Dainik Gomantak
क्रीडा

IPL 2023: ईडन गार्डनमध्ये यशस्वी जैस्वालचे वादळ! RR ने KKR चा 9 विकेट्सने केला पराभव

Manish Jadhav

IPL 2023: आयपीएल 2023 च्या 56 व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने कोलकाता नाईट रायडर्सचा एकतर्फी सामन्यात 9 गडी राखून पराभव केला.

पहिल्यांदा फलंदाजी करताना कोलकाताने 20 षटकांत 8 गडी गमावून 149 धावा केल्या. प्रत्युत्तरात, यशस्वी जैस्वालच्या आयपीएल इतिहासातील सर्वात वेगवान अर्धशतकामुळे राजस्थानला 14 व्या षटकातच सामना जिंकता आला.

दरम्यान, 150 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना राजस्थानची दमदार सुरुवात झाली. यशस्वी जैस्वालने पहिल्याच षटकात 26 धावा ठोकल्या.

कोलकाताचा कर्णधार नितीश राणाने पहिल्याच षटकात तीन चौकार आणि दोन षटकार दिले. मात्र, जोस बटलर खाते न उघडता धावबाद झाला.

यानंतर, संजू सॅमसन (Sanju Samson) (48) आणि यशस्वी जैस्वाल (98) यांनी शतकी भागीदारी करत संघाला विजय मिळवून दिला.

दुसरीकडे, पहिल्यांदा फलंदाजी करताना कोलकाता नाईट रायडर्सने 20 षटकांत 8 गडी गमावून 149 धावा केल्या.

कोलकाताकडून व्यंकटेश अय्यरने सर्वाधिक 57 धावा केल्या. तर, राजस्थान रॉयल्सकडून यजुवेंद्र चहलने 4, तर ट्रेंट बोल्टने 2 विकेट घेतल्या.

प्रत्युत्तरात राजस्थान रॉयल्सचा सलामीवीर यशस्वी जैस्वालने आयपीएलच्या (IPL) इतिहासातील सर्वात वेगवान अर्धशतक ठोकले. त्याने 13 चेंडूत 50 धावा पूर्ण केल्या.

तसेच, पहिल्यांदा फलंदाजीसाठी उतरलेल्या कोलकाता नाईट रायडर्सची सुरुवात चांगली झाली नाही. पॉवरप्लेमध्येच संघाने दोन्ही सलामीवीरांच्या विकेट्स गमावल्या.

जेसन रॉय तिसऱ्या षटकात 8 चेंडूत 10 धावा काढून बाद झाला. तर रहमानउल्ला गुरबाजचा संदीप शर्माने मिडऑफला अप्रतिम झेल घेतला.

त्याने 18 धावा केल्या. त्यानंतर राणा आणि व्यंकटेश यांनी डाव सांभाळला. मात्र, कर्णधार नितीश राणा 17 चेंडूत 22 धावा करुन पॅव्हेलियनमध्ये परतला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kanguva: 'कंगुवा'चा टीझर घालतोय धूमाकूळ; गोव्यासह ‘या’ खास ठिकाणी झालं बीग बजेट चित्रपटाचं शूटिंग

Goa Congress: सार्दिन घरात बसून विरियातोंचा प्रचार करतात; पाटकरांनी टोचले MP फ्रान्सिस यांचे कान

Prajwal Revanna: आम्ही व्हिसा दिला नाही… प्रज्वल रेवन्ना जर्मनीला पळून गेल्याच्या प्रश्नावर परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया

Shashi Tharoor In Goa: भाजपला धक्का बसणार, 400 नव्हे 200 पार करने देखील जड जाणार - थरुर

Goa Police : २४ वर्षांपासून अजूनही ‘ते’ न्यायाच्या प्रतिक्षेत; बडतर्फ पोलिसाची व्यथा

SCROLL FOR NEXT