Pernem: पेडणेत संगीत खुर्चीचा खेळ संपेना; नेते बदलले क्रम बदलला, नगरपालिका-तुये ग्रामपंचायत सीमावाद कायम

Pernem Municipal Council: पेडणे नगरपालिका ही ‘क’ दर्जाची असून पालिकेत नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्षपदाचा संगीत खुर्चीचा खेळ हा शेवटपर्यंत पाहायला मिळत आहे.
Pernem Municipal Council
Pernem Municipal CouncilDainik Gomantak
Published on
Updated on

पेडणे: पेडणे नगरपालिका ही ‘क’ दर्जाची असून पालिकेत नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्षपदाचा संगीत खुर्चीचा खेळ हा शेवटपर्यंत पाहायला मिळत आहे. मार्च २०२१ मध्ये झालेल्या पेडणे नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी पेडणेचे तत्कालीन आमदार बाबू आजगावकर यांनी भाजपाचे पॅनल उभे केले होते.

निवडणुकीत भाजपच्या गटाचे विष्णू उर्फ बाप्पा साळगावकर, सिद्धेश पेडणेकर, माधव शेणवी देसाई, उषा नागवेकर, राखी कशालकर व तृप्ती सावळ देसाई असे सहा नगरसेवक निवडून आले. तर, शिवराम तुकोजी, मनोज हरमलकर, अश्विनी पालयेकर, विशाखा गडेकर हे चार उमेदवार अपक्ष नगरसेवक म्हणून निवडून आले.

Pernem Municipal Council
Goa Drowning Death: मौजमजा बेतली जीवावर! पोळे बीचवर कर्नाटकातील 19 वर्षांचा तरुण बुडाला, शोध सुरू

नंतर हे चार नगरासेवकही या भाजपच्या गटात सामील झाले. बाबू आजगावकर यांनी उषा नागवेकर, विष्णू साळगावकर, माधव सीनाय देसाई व सिद्धेश पेडणेकर यातील प्रत्येकाला एक वर्ष दोन महिने नगराध्यक्षपद तर मनोज हरमलकर राखी कशालाकर, शिवराम तुकोजी व तृप्ती सावळ देसाई यांना अशाच प्रकारे उपनगराध्यक्षपद देण्याचे ठरवले.

कालांतराने एक वर्षानंतर विधानसभा निवडणूक आली व बाबू आजगावकर यांना भाजपने पेडणे मतदारसंघाऐवजी मडगाव मतदार संघातून निवडणूक लढवण्यास सांगितले.

इतके दिवस ‘मगो’ चे उमेदवार म्हणून पेडणे मतदार संघाची ओळख करून घेतलेले प्रवीण आर्लेकर यांनी निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये उडी घेतली व त्यांना पेडणे मतदारसंघात भाजपची उमेदवारी दिली व ते निवडूनही आले. त्यानंतर बाबू आजगावकर यांच्या काळात ज्या नगरसेवकांना नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष होण्याचा क्रम ठरवण्यात आला होता.

त्याची अंमलबजावणी झाली नाही. या काळात आठ नगरासेवक, नगरसेविका नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष झाले. तर निवडणुकीला महिने उरले असताना नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष ही पदे प्रत्येकी दीड महिन्याच्या कालावधीसाठी वाटून घेण्यात आली.

Pernem Municipal Council
Bengaluru to Goa Vande Bharat: प्रवास सुखकर होणार! बंगळुरू ते गोवा आता फक्त 13 तासांत; रेल्वे मंत्रालयाकडून 'वंदे भारत एक्स्प्रेस'चा प्रस्ताव

पाच वर्षापूर्वीच्या समस्या

निवडणुकीपूर्वी या नगरपालिका क्षेत्रातील बऱ्याच भागात सुरळीत पाणीपुरवठा होत नव्हता, पार्किंगची समस्या, पेडणे नगरपालिका-तूये ग्रामपंचायत सीमावादही बरीच वर्षे सुटलेला नाही, मासळी मार्केटमध्ये पावसाळ्यात मोठा पाऊस झाल्यावर काही वेळा पावसाचे पाणी शिरते ही समस्या अजून सुटलेली नाही. रस्त्यावर भरणारा आठवडी बाजार हे गेल्या अनेक वर्षापासून समस्येच्या गर्तेत आहे.

प्रकल्प प्रलंबित...

पेडणे नगरपालिकेच्या नव्या इमारतीबरोबरच मासळी मार्केट व अन्य बाजारासाठी तरतूद असलेला प्रकल्प प्रलंबित आहे. प्लास्टिक कचऱ्यापासून इंधन निर्मितीचा प्रकल्प तयार झाला आहे. पण, तालुक्याच्या विविध भागातून कचरा गोळा करण्यासाठी पालिकेशी वाहने उपलब्ध नसल्याने हा प्रकल्प तयार होऊनही सुरू होऊ शकलेला नाही. त्यामुळेे त्याचे काय होणार याची चर्चा रंगत आहे.

विकास कामे

चांदेल येथील जल प्रकल्पाची क्षमता वाढवल्याने नगरपालिका क्षेत्रातील पाण्याची समस्या बऱ्याच अंशी सुटलेली आहे, ‘जी सुडा’ खाली सुमारे आठ कोटींची नगरपालिकेची इमारत पूर्ण झाली व या इमारतीत पालिकेचे कामकाजही सुरू झालेले आहे.

विकास कामे

चांदेल येथील जल प्रकल्पाची क्षमता वाढवल्याने नगरपालिका क्षेत्रातील पाण्याची समस्या बऱ्याच अंशी सुटलेली आहे, ‘जी सुडा’ खाली सुमारे आठ कोटींची नगरपालिकेची इमारत पूर्ण झाली व या इमारतीत पालिकेचे कामकाजही सुरू झालेले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com