Olive Ridley turtles: मोरजी किनाऱ्यावर सोडली 93 कासवांची पिल्ले, वर्षभरात 4200 हून अधिक अंडी

Morjim Beach: डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्याला या हंगामात तेंबवाडा मोरजी समुद्रकिनारी भागात सागरी कासवानी पहिल्यांदाच अंडी घातली होती.
Olive Ridley turtles
Olive Ridley turtlesDainik Gomantak
Published on
Updated on

मोरजी: डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्याला या हंगामात तेंबवाडा मोरजी समुद्रकिनारी भागात सागरी कासवानी पहिल्यांदाच अंडी घातली होती. त्या अंड्यामधून एकूण ९३ पिल्ले समुद्रात सोडण्यास वन्य खात्याला यश मिळाले. डिसेंबरचा शेवटचा आठवडा ते २० फेब्रुवारी या कालावधीत आतापर्यंत ३६ सागरी कासवांनी ४२०० हून अधिक अंडी घातलेली आहे आणि ही अंडी सुरक्षित ठेवण्याचे काम वनविभाग करीत आहे.

दरम्यान, कासव संवर्धन मोहिमेसाठी तत्कालीन मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर यांनी एकूण ५०० चौरस मीटर जागा तेंब वाडा समुद्रकिनारी भागात आरक्षित ठेवली होती. या ठिकाणी मऊ मऊवाळू होती.

त्या वाळूत वन विभाग ज्या ठिकाणी सागरी कासव जाऊन अंडी घालायची, ती अंडी आणून या जागेत सुरक्षित ठेवण्याचे काम कर्मचारी करत होते.

Olive Ridley turtles
Goa Drowning Death: मौजमजा बेतली जीवावर! पोळे बीचवर कर्नाटकातील 19 वर्षांचा तरुण बुडाला, शोध सुरू

परंतु, ज्या ठिकाणी जागा सुरक्षित ठेवली होती. त्या जागेपर्यंत आता समुद्राचे पाणी पोचत असल्यामुळे कासवांची अंडी सुरक्षित ठेवण्यासाठी किनाऱ्यावर शिल्लक जागाच उरलेली नाही. त्या बदल्यात वन विभागाने वाळूच्या तेंबावर ज्या ठिकाणी हंगामी स्वरूपाची झोपडी होती. ती हटवून त्या ठिकाणी अंडी सुरक्षित ठेवण्यासाठी जागा सुरक्षित केलेली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com