Yuzvendra Chahal and Dhanashree Verma Anniversary Dainik Gomantak
क्रीडा

Viral Video: धनश्री चहलची सासुरवाडी लईच भारी! बटलर आहे सासरा, तर अश्विन...

युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांना लग्नाच्या वाढदिवसानिमित्त राजस्थान रॉयल्सने हटके शुभेच्या दिल्या आहेत.

Pranali Kodre

Yuzvendra Chahal and Dhanashree Verma Anniversary: भारतीय संघाचा फिरकीपटू युजवेंद्र चहल आणि त्याची पत्नी आणि डांसर धनश्री वर्मा यांच्या लग्नाला गुरुवारी दोन वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्ताने त्यांना अनेकांनी शुभेच्छा दिल्या आहेत. पण, त्यातही राजस्थान रॉयल्सने या दाम्पत्याला दिलेल्या शुभेच्छांनी सर्वांचेच लक्ष वेधले आहे.

युजवेंद्र आणि धनश्री यांनी २२ डिसेंबर २०२० रोजी लग्नगाठ बांधली होती. त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त राजस्थान रॉयल्सने एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ हिंदी चित्रपट 'हम साथ साथ है' मधील गाण्यावर आधारीत बनवला आहे.

या व्हिडिओच्या माध्यमातून असे दाखवण्यात आले आहे की धनश्रीला राजस्थान रॉयल्स तिच्या सासुरवाडीतील सदस्यांची ओळख करून दिली आहे.

या व्हिडिओमध्ये इंग्लंडच्या मर्यादीत षटकांच्या संघाचा कर्णधार जोस बटलरची कुटुंबातील प्रमुख व्यक्ती म्हणजेच धनश्रीचा सासरा म्हणून ओळख करून दिली आहे, तर त्याच्या पत्नीची सासू म्हणून ओळख करून दिली आहे. तसेच भारताचा फिरकीपटू आर अश्विन नंदोई आणि त्याची पत्नी प्रीतीची नणंद म्हणून ओळख करून दिली आहे.

हा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर चाहत्यांच्या विविध प्रतिक्रियाही येत आहेत.

चहल हा आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळतो. त्याला २०२२ आयपीएल लिलावात राजस्थान रॉयल्सने ६.५० कोटींची बोली लावत संघात सामील करून घेतले होते. त्याने गेल्या हंगामात राजस्थान रॉयल्सकडून खेळताना १७ सामन्यांत २७ विकेट्स घेतल्या होत्या. त्याची कामगिरी राजस्थान रॉयल्सला अंतिम सामन्यापर्यंत पोहचवण्यासाठी महत्त्वाची ठरली होती.

राजस्थान रॉयल्सपूर्वी चहल रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात खेळत होता. त्याने आत्तापर्यंत आयपीएलमध्ये १३१ सामने खेळताना १६६ विकेट्स घेतल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Suryakumar Yadav Controversy: पाकची तक्रार फोल! 'सूर्या' फायनल खेळणार, उलट पाकिस्तानच आला अडचणीत; 'त्या' 2 खेळाडूंवर कारवाईची टांगती तलवार

'तू मूर्ख, देवाने तुला अक्कल कमी दिली; पक्षाच्या कार्यकर्त्यांवर बोलशील तर...',शेर्लेकरांना भाजप नेत्याने दिलेल्या धमकीचा फोन कॉल समोर Audio

Goa Tourism: यंदाचा पर्यटन हंगाम जोरात! रशियाहून आठवड्याला 9 विमाने गोव्यात येणार; कझाकिस्तानहूनही सुरु होणार चार्टर सेवा

Horoscope: मेष, कर्कसह 'या' 4 भाग्यवान राशींसाठी आजचा दिवस 'गोल्डन' ठरणार! अचानक धनलाभाचे योग आणि करिअरमध्ये प्रगती निश्चित

India vs Pakistan: टीम इंडियाला हरवण्यासाठी पाकड्यांचा 'मास्टरप्लॅन', शोएब अख्तर, म्हणाला, 'त्या' फलंदाजाला 2 ओव्हर्समध्ये आउट करा

SCROLL FOR NEXT