IPL Auction 2023: परदेशी 'ऑलराऊंडर' होणार मालामाल? 'या' तीन क्रिकेटर्सला मिळू शकते सर्वाधिक पसंती

आयपीएल लिलावात कोणता परदेशी क्रिकेटर होऊ शकतो मालामाल?
IPL Auction 2023
IPL Auction 2023 Dainik Gomantak
Published on
Updated on

IPL Auction 2023: इंडियन प्रीमियर लीग 2023 (आयपीएल) लिलावासाठी सर्व 10 फ्रँचायझी सज्ज आहेत. हा लिलाव कोचीला शुक्रवारी होणार असून दुपारी 2.30 वाजता लिलावाला सुरुवात होईल. या लिलावातून प्रत्येक फ्रँचायझी आपला संघ भक्कम करण्याच्या प्रयत्नात दिसून येईल.

दरम्यान, या लिलावात अनेक दिग्गज परदेशी खेळाडू सामील आहेत. यातील काही असे चेहेरे आहेत, ज्यांना कोट्यावधी रुपयांची बोली लागू शकते. या लेखातून आपण त्या तीन परदेशी खेळाडूंवर नजर टाकू, ज्यांना लिलावात सर्वाधिक पसंती मिळू शकते.

IPL Auction 2023
IPL Auction 2023: बापरे! 19 खेळाडूंची बेस प्राईस 2 कोटी, पण एकही भारतीय नाही! पाहा संपूर्ण लिस्ट

1. बेन स्टोक्स - सध्याच्या क्रिकेटमधील सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडूंमध्ये बेन स्टोक्सला गणले जाते. त्याने गेल्या काही वर्षात त्याच्या संघांसाठी खूप महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यामुळे तो इंग्लंडचा प्रमुख खेळाडूंपैकी एक खेळाडूही ठरला आहे. त्याने नुकतेच टी20 वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यातही महत्त्वपूर्ण अर्धशतकी खेळी केली होती.

त्याने यापूर्वीही आयपीएलमध्ये खेळताना चांगली कामगिरी केली आहे. त्याने 43 आयपीएळ सामन्यांमध्ये दोन शतकांसह 943 धावा आणि 28 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच त्याने आत्तापर्यंत रायझिंग पुणे सुपरजायंट्स आणि राजस्थान रॉयल्स संघांचे प्रतिनिधित्व केले आहे. त्यामुळे त्यालाही फ्रँचायझींची पसंती मिळू शकते.

IPL Auction 2023
IPL Auction 2023: लिलावात होणार कोट्यावधींची उधळण, पण कोणाकडे किती रक्कम शिल्लक?

2. कॅमेरॉन ग्रीन - ऑस्ट्रेलियाचा युवा अष्टपैलू क्रिकेटपटू कॅमेरॉन ग्रीन यानेही गेल्या काही दिवसात त्याची वेगळी ओळख निर्माण केली आहे. उंचपुरा क्रिकेटपटू असलेला ग्रीन ऑस्ट्रेलियाकडून 2022 चा टी20 वर्ल्डकपही खेळला आहे.

त्याने सप्टेंबरमध्ये भारताविरुद्ध झालेल्या टी20 मालिकेतही शानदार दोन अर्धशतके केली होती. तसेच तो कोणत्याही क्रमांकावर फलंदाजी करू शकतो आणि गोलंदाजीही तो करू शकतो. त्याचमुळे त्यालाही आयपीएल लिलावात फ्रँचायझींकडून मोठी पसंती मिळण्याची शक्यता आहे.

IPL Auction 2023
IPL Auction 2023: आयपीएल लिलावात सहभागी झालेले 3 वयस्कर खेळाडू, एकाच्या नावावर तीन हॅट्रिक

3. सॅम करन - इंग्लंडचा डावखरी अष्टपैलू क्रिकेटपटू सॅम करनवर या आयपीएल लिलावात सर्वांचेच लक्ष राहाणार आहे. त्याला गेल्यावर्षी दुखापतीमुळे आयपीएलला मुकावे लागले होते. पण त्याने त्याआधी आयपीएलमध्ये खेळताना उत्तम कामगिरी केली आहे.

तसेच त्याने 2022 टी20 वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यातही 3 विकेट्स घेत सामनावीर पुरस्कर मिळवला होता. इतकेच नाही, तर तो या टी20 वर्ल्डकपचा मालिकावीरही ठरला होता. त्याच्याकडे फलंदाजी आणि गोलंदाजीत समान योगदान देण्याची क्षमता आहे. त्यामुळे त्यालाही या आयपीएल लिलावात चांगलीच मागणी असेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com