Rajat Patidar Dainik Gomantak
क्रीडा

Team India मध्ये संधी मिळालेल्या पाटीदारची कामगिरी राहिलीये धमाकेदार, पाहा आकडेवारी

बांगलादेशविरुद्ध होणाऱ्या वनडे मालिकेसाठी रजत पाटीदारला भारतीय संघात संधी मिळाली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Team India: भारतीय क्रिकेट संघाला न्यूझीलंड दौऱ्यानंतर बांगलादेश दौऱ्यावर तीन वनडे आणि दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळण्यासाठी जायचे आहे. यातील वनडे मालिकेसाठी भारतीय संघाची निवड झाली असून रजत पाटीदार या युवा क्रिकेटपटूलाही संघात संधी देण्यात आली आहे.

पुढीलवर्षी भारतात वनडे वर्ल्डकप खेळवण्यात येणार आहे. याच धर्तीवर एकीकडे भारतीय संघात संधी मिळवण्यासाठी मोठी स्पर्धा असताना त्याला मिळालेली संधी मोठी असल्याचे मानले जात आहे.

मध्यप्रदेशकडून देशांतर्गत क्रिकेट खेळणारा रजत (Rajat Patidar) सध्या दमदार लयीत आहे. त्याने सय्यद मुश्ताक अली टी20 ट्रॉफी आणि विजय हजारे ट्रॉफी या देशांतर्गत स्पर्धेतही मध्यप्रदेशकडून शानदार कामगिरी करत सर्वांचे लक्ष वेधले होते.

त्याने गेल्या 10 डावांमध्ये मध्यप्रदेशकडून खेळताना 368 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याच्या 5 अर्धशतकांचा समावेश असून नाबाद 92 धावा ही त्याची सर्वोत्तम खेळी आहे. ही खेळी त्याने रेल्वेविरुद्ध खेळताना केली होती.

इतकेच नाही तर यावर्षी झालेल्या रणजी ट्रॉफी स्पर्धेचे विजेतेपद मध्यप्रदेशला मिळवून देण्यातही रजतने मोठा वाटा उचलला होता. त्याने यावर्षी रणजी ट्रॉफीमध्ये 6 सामन्यांमध्ये 82.25 च्या सरासरीने 2 शतके आणि 5 अर्धशतकांसह 658 धावा केल्या होत्या. तो या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा दुसऱ्या क्रमांकाचा फलंदाज होता. त्याच्या एकूणच या लयीचा त्याला फायदा झाला आणि भारतीय संघात संधी मिळाली.

रजत पाटीदारची कामगिरी

रजत पाटीदारने आत्तापर्यंत 45 प्रथम श्रेणी सामने खेळले असून 45.49 च्या सरासरीने 3230 धावा केल्या आहेत. तसेच 51 लिस्ट ए सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 1648 धावा केल्या आहेत. त्याचबरोबर त्याने 45 टी20 सामने खेळले असून यामध्ये त्याने 1466 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याच्या एका शतकाचाही समावेश आहे.

शाहबाज अहमद-कुलदीप सेनलाही संधी

बांगलादेशविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघात (Team India) शाहबाज अहमद आणि कुलदीप सेन या क्रिकेटपटूंनाही संधी मिळाली आहे. रविंद्र जडेजा आणि यश दयाल हे दुखापतग्रस्त असल्याने त्याच्या जागेवर शाहबाद आणि कुलदीप यांची वर्णी लागली आहे.

बांगलादेशविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघ -

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), शिखर धवन, विराट कोहली, रजत पाटीदार, श्रेयस अय्यर, राहुल त्रिपाठी, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), शाहबाज अहमद, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, दीपक चहर, कुलदीप सेन

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Love Horoscope: लग्नाचा विचार करताय? वृषभ राशीच्या लव्ह लाईफमध्ये येणार गोडवा, सुरुवातीचे 6 महिने टाळावा 'हा' मोठा निर्णय

"कधीच विराटला बोलावलं नाही, बोलावणारही नाही!", 'Koffee With Karan'मध्ये कोहलीला 'नो एन्ट्री'; करण जोहरचं धक्कादायक विधान

"गोव्यात हे चाललंय काय?", 450 रुपयांच्या टॅक्सी स्कॅममधून सुटलो, पोलिसांनी 500 रुपये घेतले; जर्मन इन्फ्लुएंसरचा Video Viral

7th Pay Commission Goa: सातवा वेतन आयोग लागू करा! गोव्यातील पंचायत कर्मचाऱ्यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

Ratnagiri: 'समुद्रस्नान' जीवावर बेतलं!गणपतीपुळे समुद्रात तीन पर्यटक बुडाले; एकाचा मृत्यू, दोघांना वाचवण्यात यश

SCROLL FOR NEXT