Team India: रोहित शर्माने टीम इंडियाचे T20 कर्णधारपद का सोडावे? ही 3 सर्वात मोठी कारणे

Team India, Captain: टीम इंडियाचे कर्णधारपद सोडावे आणि हार्दिक पांड्याकडे नेतृत्व सोपवावे.
Rohit Sharma
Rohit SharmaDainik Gomantak
Published on
Updated on

Rohit Sharma: T20 विश्वचषक 2022 च्या उपांत्य फेरीच्या सामन्यात इंग्लंड विरुद्ध 10 विकेट्सने पराभूत झाल्यानंतर टीम इंडिया विजेतेपदाच्या शर्यतीतून बाहेर पडली होती, त्यानंतर रोहित शर्माच्या कर्णधारपदावर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. रोहित शर्माने टी-20 फॉरमॅटमधील टीम इंडियाचे कर्णधारपद सोडावे आणि हार्दिक पांड्याकडे नेतृत्व सोपवावे, असा सल्ला जागतिक क्रिकेटमधील बहुतेक दिग्गजांनी दिला आहे.

रोहित शर्माने भारताचे T20 कर्णधारपद का सोडावे?

रोहित शर्मा (Rohit Sharma) नुकताच 35 वर्षांचा झाला आहे, त्यामुळे क्रिकेट तज्ञ टीम इंडियासाठी तरुण टी-20 कर्णधाराची मागणी करत आहेत, जो 2024 मध्ये टी-20 वर्ल्ड कप ट्रॉफी जिंकू शकेल. रोहित शर्माने टी-20 फॉरमॅटमधील टीम इंडियाचे (Team India) कर्णधारपद सोडण्याची 3 मोठी कारणे आहेत. चला तर मग या 3 कारणांविषयी जाणून घेऊया...

Rohit Sharma
Team India: न्यूझीलंडविरुद्ध या 5 स्फोटक फलंदाजांनी केल्या सर्वाधिक धावा !

1. रोहित शर्मासोबत फिटनेसची समस्या

टीम इंडियासाठी रोहित शर्माचा फिटनेस चिंतेचा विषय ठरत आहे. रोहित नुकताच 35 वर्षांचा झाला आहे. हळूहळू तो करिअरच्या अंतिम टप्प्यात पोहोचत आहे. रोहित 3-4 महिन्यातून एकदा क्रिकेटमधून ब्रेक घेतो. आयपीएलमध्ये रोहित मुंबई इंडियन्सचा कर्णधार आहे. विशेष म्हणजे, तिन्ही फॉरमॅटमध्येही टीम इंडियाचा तो कर्णधारही आहे. रोहित शर्मावर कर्णधारपदाचे दडपण स्पष्टपणे दिसत आहे. अशा परिस्थितीत रोहितला टी-20 फॉरमॅटच्या कर्णधारपदावरुन मुक्त करुन हार्दिक पांड्याकडे (Hardik Pandya) कमान सोपवायला हवी.

2. T20 फॉरमॅटमध्ये खराब फॉर्म

टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा गेल्या 12 टी-20 आंतरराष्ट्रीय डावांमध्ये केवळ एकदाच 50 धावांचा टप्पा पार करु शकला आहे. टी-20 इंटरनॅशनलमध्ये असा विक्रम रोहित शर्मासारख्या कर्तृत्वान फलंदाजाला शोभत नाही. ऑस्ट्रेलियात नुकत्याच झालेल्या T20 विश्वचषक 2022 मध्ये रोहितने 6 T20 सामन्यांमध्ये केवळ 116 धावा केल्या. यादरम्यान रोहितचा स्ट्राईक रेटही खूपच खराब होता. रोहितने 2022 च्या T20 विश्वचषकात 106.42 च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी केली.

Rohit Sharma
Team India Viral Video: टीम इंडियाचा स्वॅग, न्यूझीलंडच्या बीचवरील खेळाडूंचा व्हिडिओ व्हायरल

3. T20 कर्णधार बनण्याचा हार्दिक पांड्याचा दावा अधिक बळकट

भारताचा नवा T20 कर्णधार बनण्याच्या शर्यतीत हार्दिक पांड्या रोहित शर्मावर दिवसेंदिवस अधिक दबाव टाकत आहे. पुढील T20 विश्वचषक 2024 मध्ये होणार आहे. हे लक्षात घेऊन बीसीसीआय रोहित शर्माच्या जागी हार्दिक पांड्याला नवा T20 कर्णधार बनवण्याच्या मूडमध्ये आहे. विशेष म्हणजे, हार्दिक पांड्याने पहिल्यांदाच गुजरात टायटन्स या नवख्या संघाला IPL 2022 चे विजेतेपद मिळवून दिले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com