Rafael Nadal ATP
क्रीडा

Rafael Nadal: नदाल इज बॅक! 349 दिवसांनी खेळलेल्या पहिल्याच एकेरी सामन्यात रोमहर्षक विजय

Pranali Kodre

Rafael Nadal beat Dominic Thiem 7-5, 6-1 at the Brisbane International:

स्पेनचा स्टार टेनिसपटू राफेल नदाल सध्या ब्रिस्बेन इंटरनॅशनल स्पर्धेत खेळत आहे. जवळपास 12 महिने टेनिसपासून दूर राहिल्यानंतर नदालसाठी ही पहिलीच आंतरराष्ट्रीय स्पर्धा आहे. 37 वर्षीय नदालने या स्पर्धेतील पहिला एकेरीचा सामना मंगळवारी (2 जानेवारी) खेळला.

नदालने मंगळवारी ऑस्ट्रियाच्या डॉमिनिक थीमविरुद्ध विजयाची नोंद केली. त्याने थीमला 7-5, 6-1 अशा सरळ दोन सेटमध्ये पराभूत केले. हा त्याचा एकेरीतील पुनरागमनाचाही सामना ठरला. तो तब्बल 349 दिवसांनी आंतरराष्ट्रीय स्थरावर एकेरीचा सामना खेळला.

यापूर्वी तो अखेरचा सामना अखेरचा एकेरीचा सामना ऑस्ट्रेलियन ओपन 2023 स्पर्धेत खेळला होता. त्या स्पर्धेत तो दुसऱ्या फेरीनंतर बाहेर झाला होता. त्यानंतर तो बराच वेळ दुखापतीशी सामना करत होता. त्याला जूनमध्ये शस्त्रक्रियाही करून घ्यावी लागली. त्यामुळे त्याला जवळपास एक वर्ष आंतरराष्ट्रीय स्थरावर टेनिस खेळता आले नाही.

थीमविरुद्ध एकतर्फी विजय

22 ग्रँडस्लॅम विजेत्या नदाल आणि थीम यांच्यात पहिल्या सेटमध्ये चांगलीच चुरस पाहायला मिळाली होती. दोघेही एकमेकांना तगडे आव्हान देत होते. मात्र नदालनेच पहिल्या सेटमध्ये बाजी मारत आघाडी घेतली. त्यानंतर दुसऱ्या सेटमध्ये नदालने थीमला डोके वर करू दिले नाही. त्याने या सेटमध्ये पूर्ण वर्चस्व राखताना सामनाही जिंकला.

नदाल या सामन्याबद्दल म्हणाला, 'माझ्या कठीण टेनिस कारकिर्दीतील कदाचीत आज माझ्यासाठी खूप भावनिक आणि महत्त्वाचा दिवस आहे, यात कसलीच शंका नाही. मला एका वर्षाने पुनरागमनाची संधी मिळाली आणि या प्रेक्षकांसमोर खेळण्याची संधी मिळाली.'

'पहिल्या दिवशी आम्हाला आनंद झाला. गेल्या एकवर्षात जे माझ्याबरोबर होते, त्या माझ्या कुटुंबियांसाठी, माझ्या संघासाठी आणि माझ्यासाठीही हा अभिमानाचा क्षण आहे.'

दुहेरीत नदाल पराभूत

दरम्यान, नदालने आंतरराष्ट्रीय टेनिसमध्ये दुहेरीच्या सामन्यातून पुनरागमन केले होते. त्याने त्याचा प्रशिक्षक मार्क लोपेझसह ब्रिस्बेन इंटरनॅशनलमधील पहिल्या फेरीत दुहेरीचा सामना खेळला होता.

मात्र त्यांच्या जोडीला 31 डिसेंबर रोजी मॅक्स पर्सेल आणि जॉर्डन थॉम्पसन या जोडीने 6-4, 6-4 अशा सरळ दोन सेटमध्ये पराभूत केले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

St. Francis Xavier DNA चाचणी मागणीने गोव्यात धार्मिक तेढ; हिंदुवादी संघटना, ख्रिस्ती समाजाचे राज्यभर मोर्चे, वातावरण तंग

Saint Estevam Accident: बाशुदेव भंडारी बेपत्ता प्रकरणी मित्र कल्पराज आणि प्रेयसीची दोन तास चौकशी; पोलिसांकडून प्रश्नांची सरबत्ती!

Goa Today's News Live: DNA चाचणी मागणीचा वाद; कोलवा सर्कल ब्लॉक, वाहतूक वळवली!

Sunburn Festival 2024: सनबर्नविरोधात कामुर्लीत स्थानिकांचा कडक विरोध; उद्याची बैठक ठरणार निर्णायक!

Mhadei Water Dispute: ...कर्नाटकाविरोधात लढण्यास सावंत सरकार ठरले कुचकामी; आलेमाव यांचा घणाघात

SCROLL FOR NEXT