R Ashwin AFP
क्रीडा

IND vs ENG: अश्विन तिसरी कसोटी अर्ध्यात सोडून तातडीने का परतला घरी, बीसीसीआयच्या उपाध्यक्षांकडून खुलासा

R Ashwin withdrawn from 3rd Test: अश्विन राजकोट कसोटीतील दुसऱ्या दिवसाच्या खेळानंतर तातडीने चेन्नईला घरी परतला आहे, यामागील नेमके कारण बीसीसीआयच्या उपाध्यक्षांनी स्पष्ट केले आहे.

Pranali Kodre

R Ashwin withdrawn from India vs England 3rd Test due to Mother illness revealed by BCCI vice president Rajiv Shukla:

भारत विरुद्ध इंग्लंड संघात कसोटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील तिसरा सामना राजकोटला गुरुवारपासून खेळवला जात आहे. मात्र या सामन्याच्या दुसऱ्या दिवसाच्या खेळानंतर भारताचा अनुभवी फिरकीपटू आर अश्विन उर्वरित सामन्यातून माघार घेत तातडीने घरी रवाना झाला आहे.

बीसीसीआयने याबद्दल शुक्रवारी रात्री (16 फेब्रुवारी) माहिती देताना सांगितले होते की कुटुंबात मेडिकल एमर्जन्सी आल्याने अश्विन उर्वरित सामना खेळणार नाही.

दरम्यान, बीसीसीआयने प्रसिद्धी पत्रकात नेमके कारण सांगितले नव्हते. परंतु, बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी ट्वीटरवर अश्विनने माघार घेण्याचे नेमके कारण स्पष्ट केले आहे. त्यांनी केलेल्या ट्वीटनुसार अश्विनची आई आजारी आहे.

राजीव शुक्ला यांनी ट्वीट केले आहे की 'आर अश्विनची आई लवकरात लवकर बरी व्हावी यासाठी प्रार्थना करतो. त्याच्या आईबरोबर या काळात असण्यासाठी त्याला तातडीने राजकोट कसोटी सोडून चेन्नईला रवाना व्हावे लागले आहे.'

दरम्यान, बीसीसीआयने त्यांच्या प्रसिद्धी पत्रकात स्पष्ट केले आहे की बोर्डाकडून आणि भारतीय संघाकडून या कठीण काळात अश्विनला पूर्ण पाठिंबा मिळेल.

अश्विन राजकोट कसोटीतून बाहेर झाल्याने भारताला या सामन्यात आता 10 खेळाडूंसहच खेळावे लागणार आहे. तथापि, अश्विन उर्वरित दोन कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघात पुनरागमन करणार की नाही, याबद्दल अद्याप कोणतीही माहिती बीसीसीआयने दिलेली नाही.

अश्विनने पूर्ण केल्या 500 विकेट्स

अश्विनने राजकोट कसोटीत खेळताना इंग्लंडचा सलामीवीर झॅक क्रावलीला बाद करत त्याच्या कसोटी कारकिर्दीत 500 विकेट्स पूर्ण केल्या. तो 500 कसोटी विकेट्स घेणारा जगातील नववा गोलंदाज आहे, तर भारताचा अनिल कुंबळेनंतरचा (619 विकेट्स) दुसराच गोलंदाज आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Smriti Mandhana Wedding: नॅशनल क्रश क्लीन बोल्ड! स्मृती मानधना लवकरच लग्नबंधनात, 'या' संगीत दिग्दर्शकासोबत जुळली रेशीमगाठ

Virat Kohli: 'किंग'चा लाजिरवाणा कमबॅक: 7 महिन्यांनी परतला, पण फक्त 8 चेंडू खेळून 'शून्य'वर बाद; लज्जास्पद विक्रमाची नोंद VIDEO

कणखर गृहमंत्री ते संवेदनशील कृषीमंत्री: रवी नाईक यांच्या व्यक्तिमत्त्वाचं मुख्यमंत्री फडणवीसांकडून गौरवोद्गार

Ravi Naik: 'मी फक्त पुढे, सेनापती मात्र रवीच'; दिवंगत नेत्याला भावनिक आदरांजली

Horoscope: 71 वर्षांनंतर महासंयोग! यंदाची दिवाळी 5 शुभ योगांची, 'या' राशींचे भाग्य उजळणार; शुभ कार्यांसाठी सर्वोत्तम काळ

SCROLL FOR NEXT