R Ashwin | Rohit Sharma Dainik Gomantak
क्रीडा

R Ashwin: 'आईची शुद्ध हरपली, माझे डोळे पाणावले, पण रोहितने जे केलं त्यानंतर त्याच्याबद्दल आदर वाढला', अश्विनचा मोठा खुलासा

R Ashwin on Rohit Sharma Leadership: राजकोट कसोटीदरम्यान अचानक घरी परतताना नक्की काय घडलेलं, रोहितने कशी मदत केली, या संपूर्ण घटनेबद्दल आर अश्विनने खुलासा केला आहे.

Pranali Kodre

R Ashwin Opens Up About How Rohit Sharma Helped during Family Emergency

इंग्लंडविरुद्ध नुकत्याच झालेल्या कसोटी मालिकेत भारताला 4-1 फरकाने विजय मिळवून देण्यात अनुभवी फिरकीपटू आर अश्विनने मोलाचा वाटा उचलला. त्याने या मालिकेदरम्यान 500 कसोटी विकेट्सचा टप्पाही पार केला.

दरम्यान, या कसोटी मालिकेतील राजकोटला झालेल्या तिसऱ्या सामन्यावेळी आर अश्विन मोठा अडचणीत सापडला होता. त्याला तातडीने घरी परतावे लागले होते. विशेष म्हणजेच याच सामन्यात त्याने 500 विकेट्सचा टप्पा पार केला होता.

पण त्याचा त्याच्या या विक्रमाचा आनंद फार वेळ साजरा करता आला नाही, कारण त्याची आईला अचानक हॉस्पिटलमध्ये दाखल केल्याने त्याला घरी परतावे लागले होते. या काळात त्याला भारताचा कर्णधार रोहित शर्माकडून खूप पाठिंबा आणि साथ मिळाली. या संपूर्ण घटनेबद्दल आर अश्विनने त्याच्या युट्युब चॅनलवरील एका व्हिडिओमध्ये माहिती दिली आहे.

राजकोट कसोटीच्या दुसऱ्या दिवसाच्या खेळानंतर अश्विन तातडीने चेन्नईला रवाना झाला होता. त्याला कौटुंबिक अडचण आल्याचे बीसीसीआयने सांगितले होते. त्यामुळे तो तिसऱ्या दिवसाचा खेळ खेळू शकला नव्हता. परंतु, तो चौथ्या दिवशी पुन्हा खेळण्यासाठी उपलब्ध झाला होता.

याबद्दल त्याने सांगितले 'खेळ संपल्यानंतर आम्ही रुममध्ये गेलो, तेव्हा मला वाटले की त्यादिवशी मला माझ्या कुटुंबातील कोणाचाच फोन आला नव्हता. मला वाटले की कदचीत ते कोणाला मुलाखतीवैगरे देत असतील.'

'मी माझी पत्नी प्रितीला संध्याकाळी 7 च्या दरम्यान कॉल केला. तिच्याकडे आई-वडिलांचीही चौकशी केली. त्यावेळी तिचा आवाज कापरा झाला होता. तिने सांगितले की आईचं डोकं दुखत होतं आणि ती अचानक बेशुद्ध झाली. ते ऐकून मी स्तब्ध झालो होतो. मला काहीच सुचत नव्हतं. मला रडू येत होतं, डोक्यात वाईट विचार येत होते.'

'मी खूपवेळ रडलो. त्याचवेळी माझ्या रुममध्ये फिजिओ आले कारण मी फोन उचलत नव्हतो. त्यानंनंतर रोहित आणि द्रविड भाईपण रुममध्ये आले, मी त्यांना फक्त इतकंच सांगितलं की मला काहीच सुचत नाहीये.'

अश्विनने पुढे सांगितले की 'त्यानंतर मी चेन्नईला जाण्यासाठी फ्लाईट शोधत होतो. पण मला कोणतीच फ्लाईट सापडत नव्हती. राजकोट विमानतळ संध्याकाळी 6 नंतर बंद होते. तिथे नंतर कोणतीच फ्लाईट नसते. मला काही सुचत नव्हते.'

'रोहित आणि द्रविड भाई तेव्हा माझ्या रुममध्ये आले आणि रोहित मला म्हणाला की काहीच विचार करू नको. त्याने मला सांगितले की मी लगेचच माझ्या कुटुंबाकडे जावे. त्याने माझ्यासाठी चार्टर्ड फ्लाईटची व्यवस्था करण्याचे प्रयत्न सुरू केले.'

'मी चेतेश्वर पुजाराचेही आभार मानेल, त्याला अहमदाबादमध्ये काही फ्लाईट्स मिळाल्या. त्याने राजकोटवरून माझ्या प्रवासाची व्यवस्था केली. मला कळाले नाही की दोन तास कसे निघून गेले.'

याशिवाय अश्विनने असेही सांगितले की भारताच्या दोन फिजिओपैकी कमलेशला या प्रवासात कायम त्याच्याबरोबर राहण्यास रोहितने सांगितले होते. रोहितने त्याला कॉल करून सातत्याने माझी चौकशीही करत होता.

अश्विनने सांगितले 'साधारण रात्रीचे साडेनऊ वाजले होते. मी स्तब्ध होतो. मी याबद्दल विचारही करू शकत नव्हतो. तिथे केवळ दोन लोकं होती, ज्यांच्याबरोबर मी बोलत होतो. जर तिथे कोणी नसतं तर?'

'मी विचार केला की जरी मी कर्णधार असतो, तर मी पण माझ्या खेळाडूंना घरी जाण्यासाठी सांगितलं असतं, याबद्दल शंका नाही, परंतु मी त्याच्या काळजीपोटी दुसऱ्या लोकांना बोलावलं असतं का? मला माहित नाही, मी त्यादिवशी रोहित शर्मा एका उत्तम नेतृत्वकर्ता म्हणून पाहिलं.'

'मी अनेक कर्णधारांच्या नेतृत्वाखाली खेळलो, पण रोहितचं मन खूप चांगलं आहे. त्याने उगीचच पाच आयपीएल ट्रॉफी जिंकलेल्या नाही, धोनीनेही असे केले आहे. ईश्वर सहज सर्व देत नाही. त्याला ते सर्व मिळायला हवे, जे ईश्वर त्याला देईल.'

'या स्वार्थी जगात इतका निस्वार्थी विचार करणारा व्यक्ती दुर्मिळ आहे. त्याच्याबद्दल माझ्या मनातील आदर अधिकच वाढला. एक कर्णधार म्हणून मी नेहमीच त्याचा आदर करत आलो होतो. तो शेवटच्या क्षणापर्यंत खेळाडूंचे समर्थन करत असतो. ही सोपी गोष्ट नाही. धोनीदेखील असेच करतो, पण अश्विन त्यासाठी आणखी पुढे जातो.'

दरम्यान, अश्विननंतर सर्व स्थिर झाल्यानंतर पुन्हा खेळायला आला होता. त्यानंतर तो इंग्लंडविरुद्धच धरमशाला येथे 100 वा कसोटी सामनाही खेळला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

T20 World Cup 2026 Schedule: क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! T20 वर्ल्ड कप 2026चे वेळापत्रक जाहीर; भारत-पाकिस्तान महामुकाबला कधी?

Goa ZP Election 2025: जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी 'आप-आरजीपी' युतीचे संकेत; मनोज परब म्हणाले, 'सर्व पर्याय खुले'!

T20 World Cup 2026: रोहित शर्मा बनला टी20 वर्ल्ड कप 2026 चा 'ब्रँड ॲम्बेसेडर'; जय शहांची मोठी घोषणा!

Navpancham Yog 2025: डिसेंबर महिन्यात 'या' 3 राशींच्या लोकांचे होणार बल्ले-बल्ले, नवपंचम योग ठरणार वरदान; धनलाभासह करिअरमध्ये सकारात्मक बदलाची चिन्हे!

Goa Politics: 'नोकरी घोटाळ्यातील एजंट भाजपचे', विजय सरदेसाईंचा मोठा गौप्यस्फोट; ढवळीकरांविरोधात षड्यंत्राचा आरोप

SCROLL FOR NEXT