R Ashwin 100th Test: 92 वर्षे अन् पाच गोलंदाज... मैदानावर पाऊल ठेवताच अश्विनचा विक्रम

India Vs England: अश्विनपूर्वी 13 भारतीय खेळाडूंनी 100 कसोटी सामने खेळण्याचा पराक्रम केला होता. या यादीत सचिन तेंडुलकर पहिल्या क्रमांकावर आहे.
R Ashwin 100th Test Match
R Ashwin 100th Test MatchX, BCCI
Published on
Updated on

R Ashwin Joins 100 Test's Club:

भारत आणि इंग्लंड यांच्या धरमशाला येथे 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील शेवटचा सामना सुरू झाला आहे. हा सामना भारताचा अव्वल फिरकीपटू आर अश्विनसाठी खास असणार आहे. कारण हा त्याच्या कसोटी कारकिर्दीतील 100 सामना आहे.

अशातच या सामन्यातसाठी मैदानावर उतरताच अश्विनने दिग्गजांमध्ये स्थान मिळवले आहे. कारण, 100 कसोटी सामने खेळणारा तो भारताचा 14वा जगातील 77वा खेळाडू ठरला आहे.

याशिवाय 100 किंवा त्याहून अधिक कसोटी खेळणारा अश्विन हा भारताच्या 92 वर्षांच्या कसोटी इतिहासातील केवळ पाचवा गोलंदाज आहे.

यापूर्वी दिग्गज अनिल कुंबळे, कपिल देव, इशांत शर्मा आणि हरभजन सिंग यांनी ही कामगिरी केली आहे.

R Ashwin 100th Test Match
Rishabh Pant: "कधीकधी तुम्ही..." आयपीएलच्या तोंडावर रॉबिन उथप्पाने पंतला का केली विनंती?

अश्विनपूर्वी 13 भारतीय खेळाडूंनी 100 कसोटी सामने खेळण्याचा पराक्रम केला होता. या यादीत सचिन तेंडुलकर पहिल्या क्रमांकावर आहे. दुसऱ्या स्थानावर टीम इंडियाचे सध्याचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आहेत.

सध्या खेळत असलेल्या भारतीय खेळाडूंबद्दल बोलायचे झाले तर अश्विनच्या आधी विराट कोहली, चेतेश्वर पुजारा आणि इशांत शर्मा यांनी हा टप्पा गाठला आहे. मात्र, इशांत शर्माने शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना २०२१ मध्ये खेळला होता.

R Ashwin 100th Test Match
Rohit Sharma on Ben Duckett: 'ऋषभ पंतला त्यानं पाहिलंच नाही वाटतं...', जयस्वालवर कमेंट करणाऱ्या डकेटला रोहितचं भन्नाट उत्तर

100 कसोटी खेळणारे भारतीय गोलंदाज

अनिल कुंबळे- 132

कपिल देव- 131

इशांत शर्मा- 105

हरभजन सिंग- 103

आर अश्विन- 100*

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com