R Ashwin AFP
क्रीडा

R Ashwin Video: अश्विन बनला भारतातील सर्वात यशस्वी बॉलर, लागोपाठ दोन विकेट्स घेत मोडला कुंबळेचा मोठा विक्रम

India vs England: आर अश्विनने रांचीमध्ये सुरु असलेल्या कसोटीत इंग्लंडच्या लागोपाठ दोन विकेट्स घेत अनिल कुंबळेचा मोठा विक्रम मोडला.

Pranali Kodre

R Ashwin break Anil Kumble's record during India vs England 4th Test in Ranchi

भारत विरुद्ध इंग्लंड संघात रांचीमधील जेएससीए क्रिकेट स्टेडिटमवर कसोटी मालिकेतील चौथा सामना शुक्रवारपासून (२३ फेब्रुवारी) सुरू झाला आहे. या सामन्यादरम्यान भारताचा अनुभवी फिरकीपटू आर अश्विनने एका खास विक्रमाला गवसणी घातली आहे.

या सामन्यात तिसऱ्या दिवशी भारताचा पहिला डाव ३०७ धावांवर संपुष्टात आल्यानंतर इंग्लंडचा संघ दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी उतरला. मात्र, इंग्लंडला सुरुवातीपासूनच भारताच्या फिरकीपटूंनी आव्हान दिले.

त्यातही इंग्लंडला पहिले दोन धक्के अश्विनने दिले. त्याने पाचव्या षटकातील पाचव्या आणि सहाव्या चेंडूवर अनुक्रमे बेन डकेट आणि ऑली पोप यांना बाद केले. त्यामुळे त्याने भारतात ३५० विकेट्स घेण्याचा टप्पा पूर्ण करण्याबरोबर अनिल कुंबळेलाही मागे टाकले आहे.

अश्विन आता भारतात सर्वाधिक कसोटी विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला आहे. त्याने कुंबळेच्या भारतातील 350 कसोटी विकेट्सच्या विक्रमाला मागे टाकले आहे. विशेष म्हणजे भारतात कसोटीमध्ये 350 किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स केवळ कुंबळे आणि अश्विनलाच घेता आले आहेत.

अश्विनने त्याच्या कारकिर्दीत 500 हून अधिक विकेट्स घेतल्या आहेत. यामध्ये त्याने भारतात घेतलेल्या 350 विकेट्सचाही समावेश आहे. दरम्यान, भारतात सर्वाधिक कसोटी विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत अश्विन आणि कुंबळेनंतर हरभजन सिंग आहे. हरभजनने 265 कसोटी विकेट्स भारतात घेतल्या आहेत.

भारतात सर्वाधिक कसोटी विकेट्स घेणारे गोलंदाज (25 फेब्रुवारी 2024 पर्यंत) -

  • 352 - आर अश्विन (115 डाव)*

  • 350 - अनिल कुंबळे (115 डाव)

  • 265 - हरभजन सिंग (103 डाव)

  • 219 - कपिल देव (119 डाव)

  • 211 - रविंद्र जडेजा (85 डाव)*

अश्विनच्या इंग्लंडविरुद्धही 100 विकेट्स

दरम्यान, याच कसोटीतील पहिल्या डावात गोलंदाजी करताना अश्विनने इंग्लंडविरुद्ध कसोटीत 100 विकेट्स घेण्याचा टप्पा पार केला होता. तो इंग्लंडविरुद्ध 100 विकेट्स घेणारा भारताचा पहिलाच गोलंदाज आहे.

तसेच त्याने फलंदाजीतही इंग्लंडविरुद्ध 1000 हून अधिक धावा केलेल्या आहेत. त्यामुळे तो एखाद्या संघाविरुद्ध कसोटीत 1000 हून अधिक धावा आणि 100 हून अधिक विकेट्स घेणारा भारताचाच नाही, तर आशिया खंडातील पहिला अष्टपैलू खेळाडू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT