R Ashwin Dainik Gomantak
क्रीडा

IND vs ENG: इंग्लंडविरुद्ध अश्विनला पाच रेकॉर्ड करण्याची 'सुवर्णसंधी'; फक्त हे करावे लागेल काम

R Ashwin Records: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या मालिकेतील दुसरा कसोटी सामना विशाखापट्टणम येथे खेळवला जाणार आहे.

Manish Jadhav

R Ashwin Records: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या मालिकेतील दुसरा कसोटी सामना विशाखापट्टणम येथे खेळवला जाणार आहे. हा सामना शुक्रवार, 02 फेब्रुवारी रोजी VDCA क्रिकेट स्टेडियमवर सुरु होईल. हैदराबादमधील पहिल्या कसोटीत 28 धावांनी पिछाडीवर पडल्यानंतर टीम इंडियाला दुसऱ्या सामन्यात पुनरागमन करुन मालिकेत बरोबरी साधायची आहे. रवींद्र जडेजा आणि केएल राहुल दुखापतीमुळे दुसऱ्या कसोटी सामन्यातून बाहेर पडले आहेत. जडेजा बाहेर पडल्याने संघाचा स्टार फिरकी गोलंदाज आर अश्विनवर मोठी जबाबदारी पडेल.

दरम्यान, अश्विनने या मालिकेतील पहिल्या सामन्यात इंग्लंडविरुद्ध 6 विकेट घेतल्या होत्या. टीम इंडियाला मालिकेतील दुसरा सामना जिंकायचा असेल तर अश्विनला चांगली कामगिरी करावी लागेल. दरम्यान, अश्विन इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात एक-दोन नव्हे तर पाच मोठे विक्रम करु शकतो. अशा परिस्थितीत अश्विनला हे पाच विक्रम करण्यासाठी काय करावे लागेल ते जाणून घेऊया.

आर अश्विनला पाच विक्रम करण्याची संधी

1-अश्विनने आतापर्यंत इंग्लंडविरुद्धच्या (England) 20 कसोटी सामन्यांमध्ये एकूण 93 बळी घेतले आहेत. भारताकडून इंग्लंडविरुद्धच्या कसोटीत भागवत चंद्रशेखरच्या नावावर सर्वाधिक विकेट्स आहेत. त्याने 23 कसोटी सामन्यात 95 बळी घेतले आहेत. दुसऱ्या कसोटी सामन्यात फक्त तीन विकेट्स घेऊन अश्विन त्याला मागे टाकेल.

2-आर अश्विनने त्याच्या संपूर्ण कसोटी कारकिर्दीत एकूण 96 कसोटी सामने खेळले आहेत. या कालावधीत त्याने 496 विकेट घेतल्या आहेत. जर अश्विनने इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात फक्त 4 विकेट घेतल्या तर त्याच्या नावावर कसोटी क्रिकेटमध्ये 500 विकेट्स होतील. त्यानंतर 500 बळी घेणारा तो जगातील 9वा आणि भारताकडून दुसरा गोलंदाज बनेल.

3-भारत (India) आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी क्रिकेटचा इतिहास खूप जुना आहे. दोन्ही देशांदरम्यान कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये जेम्स अँडरसनचे नाव आघाडीवर आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी सामन्यात त्याने 139 विकेट घेतल्या आहेत. अश्विनने या सामन्यात आणखी 7 विकेट घेतल्यास त्याच्या एकूण 100 विकेट्स होतील.

4-टीम इंडियाचा स्टार फिरकीपटू आर अश्विनने आतापर्यंत खेळल्या गेलेल्या 96 कसोटी सामन्यांमध्ये 34 वेळा पाच विकेट्स घेतल्या आहेत. जर तो दोन्ही डावांत पाच बळी घेण्यास यशस्वी झाला तर तो अनिल कुंबळेचा कसोटीत भारतासाठी 35 पाच बळी घेण्याचा विक्रम मोडेल.

5-अनिल कुंबळेने भारतात आतापर्यंत सर्वाधिक विकेट्स घेतल्या आहेत. त्याने भारतीय भूमीवर 350 विकेट्स घेतल्या आहेत. अश्विनच्या नावावर 56 कसोटी सामन्यांमध्ये 343 विकेट्स आहेत. अश्विन केवळ 8 विकेट्स घेऊन कुंबळेला मागे टाकेल आणि भारताकडून सर्वाधिक कसोटी बळी घेणारा गोलंदाज बनेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mangal Gochar: नशीब बदलणार, गरिबी हटणार! 'या' 5 भाग्यशाली राशींवर होणार पैशांचा पाऊस; 24 जुलैपासून मंगळ देवाचा महाधमाका

WhatsApp Username Feature: व्हॉट्सॲपच्या 'युझरनेम' फिचरने वापरकर्त्यांचा फायदा की सायबर गुन्हेगारांची चांदी?

Goa Politics: राजकारणात 'नव्या' पक्षांचा जुना खेळ

Goa Congress: अमित पाटकर अखेर काँग्रेस भवनात; आवश्यक दस्तऐवज संबंधित पदाधिकाऱ्याकडे सुपूर्द

Durand Cup Football: आशियातील सर्वात जुनी 135 वी 'ड्युरँड कप स्पर्धा' 25 जुलैपासून; पण सलग दुसऱ्या वर्षीही गोव्याचा एकही संघ मैदानात नाही

SCROLL FOR NEXT