R Ashwin 5 Wickets Haul | 100th Test X/ICC
क्रीडा

IND vs ENG: अश्विनने 100 वी कसोटी बनवली सुपर स्पेशल! 5 विकेट्ससह कुंबळेला मागे टाकत पटकावला पहिला क्रमांक

R Ashwin 5 Wickets Haul: इंग्लंडविरुद्ध धरमशाला कसोटीत अश्विनने 5 विकेट्स घेत आत्तापर्यंत कोणत्याच भारतीय गोलंदाजाला न जमलेला कारनामा केला आहे.

Pranali Kodre

R Ashwin 5 Wickets Haul:

भारत आणि इंग्लंड संघात कसोटी मालिका सध्या सुरू असून पाचवा आणि शेवटचा सामना धरमशाला येथे गुरुवारपासून (8 मार्च) सुरू झाला आहे. या सामन्यात भारताचा अनुभवी फिरकीपटू आर अश्विनने दुसऱ्या डावात 5 विकेट्स घेत मोठा विक्रम केला आहे.

या सामन्यात भारताचा पहिला डाव तिसऱ्या दिवशी 477 धावांवर संपला. त्यामुळे इंग्लंडचा संघ दुसऱ्या डावात फलंदाजी करण्यासाठी उतरला. मात्र, अश्विनच्या फिरकी गोलंदाजीपुढे इंग्लंडचे फलंदाज संघर्ष करताना दिसले.

त्याने तिसऱ्या दिवसाच्या पहिल्याच सत्रात इंग्लंडचे सलामीवीर झॅक क्रावली (0) आणि बेन डकेट (2) यांना बाद केले. त्यानंतर त्याने ऑली पोपलाही (19) माघारी धाडले. पहिले सत्र संपण्यापूर्वी त्याने इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सला 2 धावांवरच त्रिफळाचीत केले.

यानंतर दुसऱ्या सत्राच्या सुरुवातीलाच अश्विनने बेन फोक्सला 8 धावांवर त्रिफळाचीत करत 5 विकेट्स पूर्ण केल्या. त्याने कसोटीमध्ये एका डावात 5 किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेण्याची ही 36 वी वेळ आहे.

त्यामुळे तो कसोटीत सर्वाधिक वेळा एका डावात 5 विकेट्स घेणारा भारतीय गोलंदाजही बनला आहे. त्याने कसोटीत सर्वाधिक वेळा एका डावात 5 विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत अनिल कुंबळेला मागे टाकले आणि सर रिचर्ड हॅडली यांची बरोबरी केली आहे.

कसोटीत सर्वाधिकवेळा डावात 5 विकेट्स घेणारे गोलंदाज (9 मार्च 2024 पर्यंत)

  • 67 वेळा- मुथय्या मुरलीधरन

  • 37 वेळा - शेन वॉर्न

  • 36 वेळा - सर रिचर्ड हॅडली

  • 36 वेळा - आर अश्विन

  • 35वेळा - अनिल कुंबळे

  • 34 वेळा - रंगना हेराथ

अश्विनचा 100 वा सामना

विशेष म्हणजे धरमशाला येथे होत असलेला कसोटी सामना आर अश्विनचा कारकिर्दीतील 100 वा कसोटी सामना आहे. तो 100 कसोटी सामने खेळणारा भारताचा 14 वा खेळाडू आहे.

त्याने त्याचा हा 100 वा कसोटी सामना खासही बनवला आहे. त्याने या सामन्यात पहिल्या डावातही 4 विकेट्स घेतल्या होत्या. त्यामुळे तो 100 व्या कसोटीत 9 विकेट्स घेणारा मुथय्या मुरलीधरननंतरचा दुसराच गोलंदाज ठरला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT