36 National Tournament Dainik Gomantak
क्रीडा

36 National Tournament: बॉक्सर पुष्पेंद्र ब्राँझपदकाचा मानकरी

उपांत्य लढतीत मिझोरामच्या पुष्पेंद्रवर केली मात

दैनिक गोमन्तक

पणजी: गुजरातमधील 36 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बॉक्सर पुष्पेंद्र राठी उपांत्य फेरीत पराभूत झाला, मात्र त्याच्या नावावर ब्राँझपदक नोंदीत झाले, जे गोव्‍याच्या स्पर्धेतील पाचवे पदक ठरले. (pushpendra rathi won bronze medal in 36 national sports tournament)

पुरुष बॉक्सिंगमधील मिडलवेट (75 किलो) गटातील उपांत्य लढतीत मिझोरामच्या मालासॉमित्लुआंगा याने पुष्पेंद्रवर 5-0 गुणफरकाने मात केली. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेपूर्वी पुण्यातील आर्मी स्पोर्टस इन्स्टिट्यूटमध्ये प्रशिक्षण घेतलेल्या पुष्पेंद्रने चांगला फॉर्म प्रदर्शित केला, पण मिझो बॉक्सरने ठोशांचा बेमालूम वापर करत पुष्पेंद्रचा बचाव भेदला. त्याने सोमवारी उपांत्यपूर्व फेरीत उत्तर प्रदेशच्या गगनदीप याच्यावर, तर उपउपांत्यपूर्व फेरीत हिमाचल प्रदेशच्या धरमपाल याच्यावर मात केली होती.

‘‘स्पर्धेची अंतिम फेरी गाठण्यासाठी मी प्रयत्नशील होतो, त्यासाठी सर्वोत्तम खेळ केला, पण शक्य झाले नाही. गोवा जेव्हा राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे यजमानपद भूषवेल तेव्हा मी निश्चितच चांगल्या कामगिरीसाठी कटिबद्ध असेन,’’ असे उपांत्य लढत हरल्यानंतर निराश झालेल्या पुष्पेंद्रने सांगितले.

पुष्पेंद्रसाठी आता हरियानात डिसेंबरमध्ये होणाऱ्या अॅथलिट पुरुष राष्ट्रीय स्पर्धेचे आव्हान असेल. त्यापूर्वी तो साल्वादोर द मुंद बॉक्सिंग हॉलमध्ये नियमित सराव करणार आहे. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत पदक जिंकलेल्या पुष्पेंद्र व प्रशिक्षकांसाठी गोवा हौशी बॉक्सिंग संघटनेने रोख बक्षीस जाहीर केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT