India Vs South Africa 3rd ODI: दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेतील शेवटच्या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी शानदार प्रदर्शन केले. या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार शिखर धवनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. शिखर धवनचा हा निर्णय भारतीय गोलंदाजांनी योग्य ठरवला. या सामन्यात टीम इंडियाच्या एका खेळाडूने अप्रतिम कामगिरी केली, ज्याला टी-20 वर्ल्ड कप 2022 साठी टीम इंडियामध्ये स्थान मिळालेले नाही.
हा गोलंदाज आफ्रिकन फलंदाजांसाठी काळ ठरला
वनडे मालिकेतील शेवटच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा संपूर्ण संघ 99 धावांत गारद झाला. या सामन्यात टीम इंडियाकडून जादुई फिरकी गोलंदाज कुलदीप यादव सर्वाधिक यशस्वी ठरला. 2022 च्या टी-20 विश्वचषकासाठी कुलदीप यादवला (Kuldeep Yadav) टीम इंडियामध्ये स्थान मिळू शकले नाही, परंतु या सामन्यात त्याने चमकदार कामगिरी करत आफ्रिकन फलंदाजांना हैराण केले.
संघात स्थान मिळाले नाही
टी-20 विश्वचषकासाठी (T-20 World Cup) टीम इंडियाचा भाग बनण्यात कुलदीप यादव अपयशी ठरला आहे, परंतु या सामन्यात त्याने संधीचा पुरेपूर फायदा घेतला. कुलदीप यादवने या सामन्यात 4.1 षटके टाकली, 4.32 च्या इकॉनॉमीने 18 धावा दिल्या आणि 4 बळी घेतले. कुलदीप यादवने अँडिल फेहलुकवायो, मार्को येन्सन, ब्योर्न फॉर्च्युइन आणि एनरिक नॉर्टजे यांना आऊट केले.
आशिया कपमध्येही स्थान मिळाले नाही
आशिया चषक 2022 साठी निवडण्यात आलेल्या 15 जणांच्या संघात चार फिरकीपटूंचा समावेश करण्यात आला होता, परंतु जादूई फिरकी गोलंदाज कुलदीप यादवचा या संघात समावेश करण्यात आला नाही. कुलदीप यादवने टीम इंडियासाठी (Team India) आतापर्यंत 7 कसोटी सामने, 72 वनडे आणि 25 टी-20 सामने खेळले आहेत. त्याने कसोटीत 26, एकदिवसीय सामन्यात 118 आणि T20 मध्ये 44 विकेट्स घेतल्या आहेत. त्याच वेळी, आयपीएल 2022 मध्ये, कुलदीप यादवने दिल्ली कॅपिटल्सकडून (Delhi Capitals) खेळताना 21 विकेट घेतल्या होत्या.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.