India Tour Of New Zealand: T20 वर्ल्ड कपनंतर टीम इंडिया न्यूझीलंड दौऱ्यावर, शेड्यूल जाहीर

India Tour Of New Zealand: भारतीय संघ सध्या T20 विश्वचषक खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियात आहे.
Team India
Team IndiaDainik Gomantak
Published on
Updated on

India Tour Of New Zealand: भारतीय संघ सध्या T20 विश्वचषक खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियात आहे. विश्वचषक स्पर्धेत भाग घेतल्यानंतर लगेचच भारतीय संघ न्यूझीलंड दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्याचे वेळापत्रकही जाहीर करण्यात आले आहे. कार्यक्रमानुसार, जर भारतीय संघ विश्वचषकाच्या अंतिम फेरीत गेला तर अवघ्या चार दिवसांनी त्यांना किवी संघाविरुद्ध मालिका सुरु करावी लागेल. भारतीय संघ तीन टी-20 आणि तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी न्यूझीलंड दौऱ्यावर जाणार आहे.

दरम्यान, हा दौरा 18 नोव्हेंबरपासून सुरु होणार आहे. 13 नोव्हेंबरला टी-20 वर्ल्डकपचा अंतिम सामना होणार आहे. भारतीय संघ 23 ऑक्टोबरला पाकिस्तानविरुद्धच्या मोठ्या सामन्याने सुरुवात करेल. 27 ऑक्टोबरला भारताचा (India) सामना सुपर-12 मध्ये पोहोचणाऱ्या संघाशी क्वालिफायर खेळून होणार आहे. यानंतर 30 ऑक्टोबरला त्याला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (South Africa) सामना खेळायचा आहे. भारतीय संघ 02 नोव्हेंबर रोजी बांगलादेश आणि त्यानंतर 06 नोव्हेंबर रोजी दुसऱ्या क्वालिफायर संघाशी खेळेल.

Team India
Team India Practice Match: सराव सामन्यात भारत भिडणार ऑस्ट्रेलियाविरुद्ध; वाचा एका क्लिकवर

तसेच, गेल्या वर्षी UAE मध्ये T20 वर्ल्ड खेळल्यानंतर किवी संघाने भारताचा दौरा केला होता. किवी संघाने 14 नोव्हेंबर रोजी स्पर्धेचा अंतिम सामना खेळला, दोन दिवसांनंतर 17 नोव्हेंबर रोजी त्यांनी भारताविरुद्ध टी20 मालिकेतील पहिला सामना खेळला.

Team India
Team India त पुन्हा मोठा बदल, दुखापतग्रस्त दीपक चहरऐवजी या खेळाडूला मिळाली संधी

भारताच्या न्यूझीलंड दौऱ्याचे संपूर्ण वेळापत्रक

पहिला T20 - 18 नोव्हेंबर रोजी वेलिंग्टन

दुसरा T20 - 20 नोव्हेंबर रोजी माउंट मौनगानुई

तिसरा T20 - 22 नोव्हेंबर नेपियर

पहिली वनडे - 25 नोव्हेंबर ऑकलंड

दुसरी वनडे - 27 नोव्हेंबर हॅमिल्टन

तिसरी वनडे - 30 नोव्हेंबर क्राइस्टचर्च

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com