Punit Bisht Dainik Gomantak
क्रीडा

Retirement Announced: 'या' स्टार यष्टीरक्षक फलंदाजाने 17 वर्षांच्या क्रिकेट कारकिर्दीला केला अलविदा, चाहत्यांना मोठा धक्का!

Manish Jadhav

Punit Bisht Announced Retirement: भारतीय संघाने नुकतीच वेस्ट इंडिजविरुद्धची एकदिवसीय मालिका जिंकली आहे. आता दोन्ही संघांमध्ये 5 सामन्यांची T20 मालिका (IND vs WI T20 मालिका) खेळवली जाणार आहे.

या मालिकेत हार्दिक पांड्या संघाची धुरा सांभाळणार आहे. या सगळ्या दरम्यान भारतीय देशांतर्गत क्रिकेटशी संबंधित एक मोठी बातमी समोर आली आहे.

एका स्टार यष्टीरक्षक फलंदाजाने 17 वर्षांच्या कारकिर्दीनंतर निवृत्ती जाहीर केली आहे. या खेळाडूने एकूण 272 सामने खेळले होते.

या खेळाडूने अचानक निवृत्ती जाहीर केली

दिल्लीचा माजी यष्टिरक्षक पुनित बिष्टने 17 वर्षांच्या स्पर्धात्मक क्रिकेटनंतर आपल्या क्रिकेट कारकिर्दीला अलविदा केला. त्याने तिन्ही फॉरमॅटमध्ये 272 सामने खेळले.

2007-08 च्या मोसमात दिल्लीच्या शेवटच्या रणजी ट्रॉफी (Ranji Trophy) विजेत्या संघाचा भाग असलेला 37 वर्षीय बिष्ट जम्मू काश्मीर आणि मेघालयकडूनही खेळला आहे. तो सध्या मेघालय संघाकडून खेळत होता. जानेवारीत त्याने बिहारविरुद्ध शेवटचा सामना खेळला होता.

देशांतर्गत क्रिकेटमधील आश्चर्यकारक आकडेवारी

पुनित बिश्टने 103 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 38 पेक्षा जास्त सरासरीने 5231 धावा केल्या, ज्यात 10 शतके आणि 343 धावांची व्यक्तीगत सर्वोत्तम खेळी समाविष्ट आहे. त्याने 299 झेल आणि 19 स्टंप आऊट केले.

103 लिस्ट ए सामन्यांमध्ये, पुनित बिश्टने 2924 धावा काढल्या, ज्यात सहा शतके आणि 17 अर्धशतकांचा समावेश आहे. त्याचवेळी, पुनितने 66 टी-20 सामनेही खेळले. या सामन्यांमध्ये त्याने 21.18 च्या सरासरीने 1038 धावा केल्या.

पुनीत बिश्टने निवृत्तीनंतर हे वक्तव्य केले

निवृत्तीची घोषणा केल्यानंतर पुनित बिश्टने पीटीआयला सांगितले की, 'मला वाटते की स्पर्धात्मक क्रिकेटला अलविदा करण्याची हीच योग्य वेळ आहे.

मी फर्स्ट क्लास आणि लिस्ट ए या दोन्ही फॉरमॅटमध्ये 100 हून अधिक सामने खेळलो. आता खेळाडू म्हणून साध्य करण्यासारखे फार काही नाही.'

ढाका प्रीमियर लीगचा भाग होता

स्टार यष्टीरक्षक-फलंदाज पुनीत बिश्टने दिल्लीसाठी 150 हून अधिक देशांतर्गत सामने खेळले आणि T20 क्रिकेटमध्ये संघाचे नेतृत्वही केले. दिल्लीपासून (Delhi) दूर गेल्यानंतर बिश्टने देशांतर्गत क्रिकेटमध्ये जम्मू आणि काश्मीर आणि अगदी अलीकडे मेघालयचे प्रतिनिधित्व केले आहे.

बिश्ट बांगलादेशातील ढाका प्रीमियर लीग आणि यूकेमधील लँकेशायर टी-20 लीगमध्येही खेळला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

Goa Today's News Live: बेपत्ता सुभाष वेलिंगकरांचा अटकपूर्व जामीन अर्ज!

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

Tourist in Goa: गोव्यात धार्मिक तणाव, पर्यटकांची पायपीट तर शाळकरी मुलांचे हाल!!

SCROLL FOR NEXT