Puneri Paltan | PKL10 X/ProKabaddi
क्रीडा

Pro Kabaddi 10: पुणेरी पलटण नवा विजेता! हरियाणा स्टिलर्सला फायनलमध्ये पराभूत करत पहिल्यांदाच कोरलं ट्रॉफीवर नाव

Puneri Paltan Won PKL10: पुणेरी पलटणने अंतिम सामन्यात हरियाणा स्टिलर्सचा पराभव करत प्रो कबड्डीच्या 10 व्या हंगामाचे विजेतेपद जिंकले आहे.

Pranali Kodre

Puneri Paltan won Pro Kabaddi 10 Title:

प्रो कबड्डी स्पर्धाच्या 10 व्या हंगामाचे विजेतेपद पुणेरी पलटणने पटकावलं आहे. शुक्रवारी (1 मार्च) हैदराबादमध्ये झालेल्या अंतिम सामन्यात पुणेरी पलटणने हरियाणा स्टिलर्सला पराभूत करत ट्रॉफीवर नाव कोरले.

पुणेरी पलटणचे प्रो कबड्डीमधील हे पहिलेच विजेतेपद आहे. मात्र हरियाणा स्टिलर्सचे मात्र विजेतपद जिंकण्याचे स्वप्न भंगले आहे.

दरम्यान यंदा पुणेरी पलटण आणि हरियाणा स्टिलर्सने अंतिम सामन्यात प्रवेश केल्याने प्रो कबड्डीला नवा विजेता मिळणार हे निश्चित झालेच होते, पण पहिलं विजेतेपद कोण पटकावणार याची उत्सुकता होती.

अखेर पुणेरी पलटणने अंतिम सामन्यात हरियाणाला 28-25 पाँइंट्सने पराभूत केले आणि 10 व्या हंगामाचे विजेतेपद नावावर केले.

अंतिम सामन्यात पुणेरी पलटणकडून सांघिक कामगिरी पाहायला मिळाली. या सामन्यात सुरुवातीला दोन्ही संघांकडून अटीतटीचा खेळ पाहायला मिळाला होता. पहिल्या हाफपर्यंत पुणेरी पलटण 13-10 अशा आघाडीवर होते. पण त्यांच्यात अवघ्या 3 पाँइट्सचा फरक होता.

दुसऱ्या हाफमध्येही हरियाणाने पुनरागमनाचा प्रयत्न केला. मात्र, पुणेरी पलटणने आपला खेळ उंचावत, तर नेलाच पण पाँइंट्समधील अंतरही कायम राहिल याची काळजी घेतली अखेर पुणेरी पलटणने बाजी मारली.

अंतिम सामन्यात रेडर पंकज मोहितेने सर्वाधिक 9 पाँइंट्स मिळवले. तसेच मोहित गोयतने 5 पाँइंट्स मिळवत रेडिंगमध्ये 400 पाँइंट्सचा टप्पाही पूर्ण केला. याशिवाय कर्णधार अस्लम इनामदार आणि गौरव खत्री यांनी प्रत्येकी संघासाठी 4 पाँइंट्स मिळवत विजयात योगदान दिले.

हरियाणा स्टिलर्सकडून शिवम पातारेने सर्वाधिक 6 पाइँट्स मिळवले. याशिवाय सिद्धार्थ देसाईने 4 पाँइंट्सची कमाई केली.

लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे साखळी फेरीनंतरही पुणेरी पलटणने गुणतालिकेत अव्वल क्रमांक मिळवला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs AUS: शिखर धवन-युसूफ पठाणची वादळी खेळी निष्फळ, कांगारूंनी भारताचा 4 गडी राखून केला पराभव

Usgaon Bridge: उसगावात 62 वर्षे जुनाट पूल दुरावस्थेत; स्थानिकांची दुरुस्तीची मागणी

Valpoi: बाप रे... गायीच्या पोटात प्लास्टिकचा ढीग! शस्त्रक्रिया करून तब्बल 26 किलो प्लास्टिक काढलं

Viral News: प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत सापडली पत्नी, बेदम मार खाल्यानंतर नग्नच पळाला लव्हर Watch Video

Pusapati Ashok Gajapathi Raju: पुसापती अशोक गजपती राजूंनी गोव्याचे राज्यपाल म्हणून स्वीकारली सूत्रे; आंध्रवासीयांच्या आनंदाला भरते

SCROLL FOR NEXT