Goa Under 7 Chess Tournament Dainik Gomantak
क्रीडा

Goa Chess Tournament: प्रयांक, दृषा यांना 7 वर्षांखालील बुद्धिबळात विजेतेपद

प्रयांक याने अखेरच्या फेरीत इव्हान तेलिस याला नमविले

किशोर पेटकर

Goa Under 7 Chess Tournament: राज्यस्तरीय अखिल गोवा 7 वर्षांखालील बुद्धिबळ स्पर्धेत खुल्या गटात सासष्टी तालुक्याचा प्रयांक गावकर याने, तर मुलींत मुरगावची दृषा घोंगे हिने विजेतेपद मिळविले. स्पर्धा फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर झाली.

सासष्टी तालुका बुद्धिबळ संघटनेने गोवा बुद्धिबळ संघटनेच्या मान्यतेने स्पर्धा घेतली होती. प्रयांक याने विजेतेपदावर शिक्कामोर्तब करताना अखेरच्या फेरीत इव्हान तेलिस याला नमविले.

प्रयांकने स्पर्धेत अपराजित राहताना सहा फेऱ्यांतून साडेपाच गुणांची कमाई केली. मुलींत विजेती ठरलेल्या दृषा हिने अपराजित राहत पाच गुण नोंदविले.

खुल्या गटात इव्हान तेलिस उपविजेता ठरला. नारायण (आरव) प्रभुदेसाई, सार्थक नाईक, रोनेल फर्नांडिस, स्कायलर फर्नांडिस यांना अनुक्रमे तिसरा ते सहावा क्रमांक मिळाला.

मुलींत वानिया दुकळे हिला दुसरा क्रमांक मिळाला. शनाया देसाई, तृषा पटेकर, सान्वी देसाई, सिदोनिया दा कुन्हा यांना अनुक्रमे तिसरा ते सहावा क्रमांक प्राप्त झाला.

पोलिस अधिकारी देऊ माणगावकर, गोवा बुद्धिबळ संघटनेचे सचिव आशेष केणी, सासष्टी तालुका बुद्धिबळ संघटनेचे उपाध्यक्ष दामोदर जांबावली, खजिनदार दिलीप वेर्णेकर यांच्या उपस्थितीत बक्षीस वितरण झाले.

आशेष स्पर्धेचे मुख्य आर्बिटर होते. त्यांना ज्योत्स्ना सारिपल्ली, आशा शिरोडकर, रिदिेकेश वेर्णेकर यांचे सहकार्य लाभले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

China Artificial Sun: चीन बनवणार 'आर्टिफिशियल सन'! सूर्यासारखी धगधगती ऊर्जा मुठीत; सुपरकंडक्टिंग मॅग्नेट टेस्ट यशस्वी

Youth Protest: भाजपची पोपटपंची चाललीच नाही! 'हिंदू-मुस्लिम'च्या सापळ्यात न अडकता तरुणाईचा व्यवस्थेविरुद्ध थेट एल्गार

Pakistan-Afghanistan Conflict: पाक-अफगाण सीमेवर रक्तपात! हवाई हल्ले अन् चकमकीत 500 अफगाण नागरिकांचा मृत्यू; युनायटेड नेशन्सचा धक्कादायक रिपोर्ट

Japan Earthquake: जपानमध्ये 7.1 तीव्रतेचा भूकंप! समुद्रात उसळल्या महाकाय लाटा; त्सुनामीच्या अलर्टने नागरिकांमध्ये घबराट VIDEO

Morjim CRZ Demolition: मोरजीतील भूमिपुत्रांच्या वेदना कायम! तेमवाड्यातील बांधकामांवर 6व्या दिवशीही हातोडा

SCROLL FOR NEXT