R Praggnanandhaa X/FIDE_chess
क्रीडा

Praggnanandhaa: प्रज्ञानानंदची भरारी! वर्ल्ड चॅम्पियनला हरवत बनला भारताचा टॉप-रेटेड बुद्धबळपटू, विश्वनाथन आनंदला पछाडलं

R Praggnanandhaa: प्रज्ञानानंदने मंगळवारी वर्ल्ड चॅम्पियन डिंग लिरेनला पराभूत करण्याचा पराक्रम केला आहे.

Pranali Kodre

R Praggnanandhaa became number one chess player in India:

भारताचा युवा बुद्धिबळपटू आर प्रज्ञानानंदने पुन्हा एकदा भारतीयांना अभिमान वाटेल, अशी कामगिरी नोंदवली आहे. त्याने मंगळवारी (16 जानेवारी) नेदरलँड्समध्ये झालेल्या टाटा स्टील मास्टर्स स्पर्धेत वर्ल्ड चॅम्पियन डिंग लिरेनला चौथ्या फेरीत पराभूत केले आहे. यासह तो भारताचा अव्वल बुद्धिबळपटूही झाला असून त्याने विश्वनाथन आनंदला मागे टाकले आहे.

प्रज्ञानानंदने चीनच्या लिरेनविरुद्ध काळ्या मोहऱ्यांसह वर्चस्व गाजवले. लिरेन त्याच्या चांगल्या डावपेचांसाठी ओळखला जातो, मात्र त्याला मंगळवारी प्रज्ञानानंदने आव्हान दिले. विशेष म्हणजे या दोघांमध्येच गेल्यावर्षीही सामना झाला होता, ज्यातही प्रज्ञानानंदने विजय मिळवला होता.

दरम्यान, मंगळवारी प्रज्ञानांनंदने विजय मिळवल्याने तो केवळ दुसराच असा भारतीय बुद्धिबळपटू ठरला आहे, ज्याने सध्याच्या वर्ल्ड चॅम्पियनला पराभूत केले आहे. यापूर्वी वर्ल्ड चॅम्पियन असलेल्या खेळाडूला पराभूत करण्याचा कारनामा विश्वनाथन आनंदने केला आहे.

याशिवाय आता प्रज्ञानानंदने FIDE लाईव्ह रेटिंगमध्येही आनंदला मागे टाकले आहे. प्रज्ञानानंदचे लाईव्ह रेटिंग 2748.3 आहे, तर आनंदची 2748 आहे. त्यामुळे प्रज्ञानानंद आता लाईव्ह रेटिंगमध्ये भारताचा अव्वल क्रमांकाचा बुद्धिबळपटू ठरला आहे.

त्याचे या यशाबद्दल कौतुकही होत आहे. अनेकांनी त्याचे अभिनंदन केले आहे. भारताचा दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरनेही त्याचे कौतुक केले आहे.

सचिनने लिहिले की 'प्रज्ञानानंदने वर्ल्ड चॅम्पियन डिंग लिरेनविरुद्ध केलेल्या शानदार कामगिरीबद्दल खूप कौतुक. वयाच्या 18 व्या वर्षी तू फक्त खेळवरच वर्चस्व गाजवलं नाही, तर भारताचा अव्वल क्रमांकाचा खेळाडूही ठरला. तुला आगामी आव्हानांसाठी शुभेच्छा. भारताला यापुढेही बुद्धिबळात असाच गौरव मिळवून देत रहा.'

दरम्यान, गेल्याचवर्षी प्रज्ञानानंद FIDE वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पोहचला होचा. त्या सामन्यात त्याला मॅग्नस कार्लसनने पराभूत केले होते. दरम्यान, वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात खेळणारा तो विश्वनाथन आनंद नंतरचा दुसराच खेळाडू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

सायंकाळी गोव्याचा एक मूड असतो! त्यांना जास्त वेळ थांबवणं योग्य नाही; भाषण उरकत घेत अमित शहांची मिश्किल टिप्पणी

Amit Shah In Goa: "2047 पर्यंत वाट पाहायची गरज नाही, 2037 पर्यंत गोवा 'विकसित राज्य' बनेल", गृहमंत्री अमित शहांचा विश्वास

Rohit Sharma Captaincy: 'राजकीय' खेळात 'हिटमॅन' रोहितची विकेट! टीम इंडियावर गंभीर आरोप, चाहत्यांनी व्यक्त केली नाराजी

अमित शहांच्या हस्ते 'म्हजे घर योजने'चा भव्य शुभारंभ! CM सावंतांनी दिली '6 महिन्यांत नोंदणी'ची ग्वाही

ओपा प्रकल्पातील दुरुस्ती पूर्णत्वाकडे; पणजीला 11 वाजेपर्यंत पाणीपुरवठा सुरु होण्याची शक्यता!

SCROLL FOR NEXT