Goa Cricket Team Player Ishaan Gadekar  Dainik Gomantak
क्रीडा

Pondicherry T20 : फलंदाज लक्षवेधक, पण गोलंदाज निष्प्रभ; झारखंडचा गोव्यावर सहा विकेट राखून विजय

गोव्याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली

किशोर पेटकर

Pondicherry Inter State T20 Warm-Up Matches: पुदुचेरीतील आंतरराज्य टी-20 क्रिकेट सराव स्पर्धेत शनिवारी गोव्याचे फलंदाज लक्षवेधक ठरले, मात्र गोलंदाज अपयशी ठरल्यामुळे त्यांना पराभव पत्करावा लागला. झारखंडने सामना सहा विकेट राखून जिंकला.

गोव्याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. त्यांनी ५ बाद १९० अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारली. ईशान गडेकर (६५), सुयश प्रभुदेसाई (४७), तुनीष सावकार (४१) यांची आक्रमक फलंदाजी यामुळे गोव्याच्या डावाला बळकटी आली.

ईशानने अर्धशतक नोंदविताना नव्याने संघात दाखल झालेला महाराष्ट्राचा राहुल त्रिपाठी (१५) याच्यासमवेत ४३ धावांची सलामी दिली, नंतर ईशान व सुयश यांनी दुसऱ्या विकेटसाठी ७१ धावांची भागीदारी केली.

तुनीषने तुफानी फलंदाजी करताना अवघ्या १४ चेंडूंतील खेळीत चार चौकार व तीन षटकार मारले. झारखंडने सामना आठ चेंडू राखून सामना जिंकताना ४ बाद १९१ धावा केल्या.

गोव्याचा संभाव्य सीनियर क्रिकेट संघ मोसमपूर्व सरावासाठी सध्या पुदुचेरीत आहे. तेथे संघ स्पर्धा खेळणार असून शिबिरही तेथेच होईल.

संक्षिप्त धावफलक

गोवा : २० षटकांत ५ बाद १९० (ईशान गडेकर ६५- ४१ चेंडू, ८ चौकार, २ षटकार, राहुल त्रिपाठी १५, सुयश प्रभुदेसाई ४७- ३२ चेंडू, ७ चौकार, दर्शन मिसाळ ११, दीपराज गावकर नाबाद ५, तुनीष सावकार ४१- १४ चेंडू, ४ चौकार, ३ षटकार, कश्यप बखले नाबाद २, बालकृष्ण ४-०-४०-२, रवी यादव ४-०-२४-३) पराभूत

वि. झारखंड : १८.२ षटकांत ४ बाद १९१ (सौरभ तिवारी २३, विकास विशाल ४४- २३ चेंडू, ५ चौकार, २ षटकार, आयुष भारद्वाज नाबाद ५०- ३३ चेंडू, २ चौकार, ३ षटकार, आदित्य सिंग २३, पंकज कुमार नाबाद ३२, लक्षय गर्ग ४-०-४०-२, हेरंब परब २-०-२२-०, फेलिक्स आलेमाव ३-०-३१-१, वेदांत नाईक ३-०-३६-०, सुयश प्रभुदेसाई ४-०-३५-०, दर्शन मिसाळ २.२-०-२३-०).

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Today's Live Updates Goa: "कॅश फॉर जॉब स्कॅम प्रकरणात सरकारने कडक कारवाई करणे आवश्यक"

Goa App: 8.43 कोटी रुपयांची गुंतवणूक मिळवण्याची संधी हुकली; गोव्याचा उद्योग अमेरिकेत Tim Draper च्या शोमध्ये झळकला पण...

ड्रोनने ठेवली जाणार Iffi, Exposition वर नजर; 1,500 पोलिस, IRB फोर्स तैनात! पर्यटन सुस्साट, हॉटेल्स फुल्ल!

Keerthy Suresh Wedding: कीर्ती सुरेशच्या लग्नाचा मुहूर्त ठरलाय; 'या' दिवशी प्रियकरासोबत गोव्यात बांधणार लग्नगाठ

IFFI 2024: In Conversation मध्ये दिग्गजांची मांदियाळी! रेहमान, मणीरत्नम, रणबीरसोबत खुला संवाद

SCROLL FOR NEXT