FC Goa: इंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धेपूर्वी एफसी गोवापासून अल्वारो वाझकेझ विभक्त

एफसी गोवाने आता स्पॅनिश मार्गदर्शक मानोलो मार्केझ यांची मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती केली आहे.
FC GoaAlvaro Vazquez
FC GoaAlvaro Vazquez Dainik Gomantak

FC Goa: एफसी गोवा आणि स्पॅनिश आघाडीपटू अल्वारो वाझकेझ यांनी आगामी इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेपूर्वी सामंजस्याने विभक्त होण्याचा निर्णय घेतला. यासंदर्भात क्लबने सोशल मीडियाद्वारे शनिवारी माहिती दिली.

एफसी गोवाने 32 वर्षीय वाझकेझ याच्याशी गतवर्षी जूनमध्ये दोन वर्षांचा करार केला होता, मात्र एका वर्षांनंतर त्यांनी करार संपुष्टात आणण्याचे ठरविले. वाझकेझ 2021-22 मोसमात केरळा ब्लास्टर्सतर्फे खेळला होता. 2022-23 मोसमातील आयएसएल स्पर्धेत त्याने एफसी गोवाचे 18 सामन्यांत प्रतिनिधित्व करताना एक गोल व तीन असिस्ट अशी कामगिरी केली.

एफसी गोवाने आता स्पॅनिश मार्गदर्शक मानोलो मार्केझ यांची मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती केली आहे. आघाडीफळीत त्यांनी कार्लोस मार्टिनेझ या नव्या स्पॅनिश खेळाडूची निवड केली आहे.

FC GoaAlvaro Vazquez
म्हापसा अर्बन बँकेकडे 18 कोटींहून अधिक रक्कमेच्या बेवारस ठेवी, दावा करण्यासाठी 40 दिवसांची मुदत

सध्या सुरू असलेल्या 132 व्या ड्युरँड कप फुटबॉल स्पर्धेत एफसी गोवाने उपांत्यपूर्व फेरी गाठली असून तिन्ही सामन्यांत मार्टिनेझ याने चांगला खेळ करताना दोन गोल नोंदवून उपयुक्तता सिद्ध केली. कार्लोस आघाडीफळीत स्थिरावत असल्याने एफसी गोवाने आता वाझकेझ याला करारमुक्त करण्याचे ठरविले आहे.

ड्युरँड कप स्पर्धेसाठी एफसी गोवा संघात गतमोसमातील मोरोक्कन नोआ सदोई, कार्लोस मार्टिनेझ, व्हिक्टर रॉड्रिगेझ व ओडेई ओनाइंडिया हे स्पॅनिश, तसेच ऑस्ट्रेलियन पावलो रेट्रे असे पाच परदेशी खेळाडू निवडले आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com