Man of the Match award in the IPL 2023 season: इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएलचा सध्या 16 वा हंगाम सुरू आहे. या हंगामात गेल्या महिन्याभरापासून चाहत्यांना रोमांचक सामने पाहायला मिळत आहेत. 7 मे पर्यंत या हंगामात आत्तापर्यंत 52 सामने खेळून पूर्ण झाले आहेत.
या सामन्यांमध्ये कधी फलंदाजांची तुफानी फटकेबाजी, तर कधी गोलंदाजांचे वर्चस्व सामन्यांमध्ये दिसत आहे. या दरम्यान अनेक विक्रमही झाल्याचे पाहायला मिळाले. पण असा एक विक्रम आहे, जो पहिल्यांदाच घडला आहे.
यंदा आयपीएलमध्ये सर्वाधिक देशांतील खेळाडूंना सामनावीराचा पुरस्कार मिळाला आहे. 16 व्या आयपीएल हंगामात भारतासह एकूण 10 देशातील खेळाडूंना आत्तापर्यंत सामनावीराचा पुरस्कार मिळाला आहे. हा एक विक्रम आहे.
आत्तापर्यंत सर्वाधिक 22 भारतीय खेळाडूंना सामनावीराचा पुरस्कार मिळाला आहे. त्यापाठोपाठ इंग्लंडच्या 6 खेळाडूंना आणि ऑस्ट्रेलियाच्या 5 खेळाडूंना सामनावीर पुरस्कार मिळाला आहे. तसेच वेस्ट इंडिज आणि न्यूझीलंड यांच्या प्रत्येकी 2 खेळाडूंनी सामनावीर पुरस्कार जिंकला आहे, तर अफगाणिस्तान, दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे, आयर्लंड आणि श्रीलंका देशांच्या प्रत्येकी एका खेळाडूंने सामनावीर पुरस्कार जिंकला आहे.
या देशांव्यतिरिक्त बांगलादेश आणि नामिबिया या देशांचे खेळाडूही आयपीएलमध्ये सहभागी आहेत. पण त्यांना अद्याप सामनावीर पुरस्कार जिंकता आलेला नाही.
भारत - शुभमन गिल, ईशान किशन, शार्दुल ठाकूर, कृणाल पंड्या, यशस्वी जयस्वाल, रविंद्र जडेजा, अर्शदीप सिंग, साई सुदर्शन, आर अश्विन, रिंकू सिंग, शिखर धवन, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, इशांत शर्मा, वेंकटेश अय्यर, अक्षर पटेल, मोहम्मद शमी, रोहित शर्मा, मोहित शर्मा, मोहम्मद सिराज, अभिनव मनोहर, वरुण चक्रवर्ती.
इंग्लंड - सॅम करन, मोईन अली, हॅरी ब्रुक, जोस बटलर, मार्क वूड, फिलिप सॉल्ट
ऑस्ट्रेलिया - मार्कस स्टॉयनिस, ग्लेन मॅक्सवेल, मिशेल मार्श, नॅथन एलिस, कॅमेरॉन ग्रीन
न्यूझीलंड - डेव्हॉन कॉनवे, ग्लेन फिलिप्स
वेस्ट इंडिज - शिमरॉन हेटमायर, निकोलस पूरन
आयर्लंड - जोशुआ लिटिल
झिम्बाब्वे - सिकंदर रझा
श्रीलंका - मथिशा पाथिराना
अफगाणिस्तान - राशीद खान
दक्षिण आफ्रिका - फाफ डू प्लेसिस
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.