Marcus Stoinis Dainik Gomantak
क्रीडा

Marcus Stoinis: जेव्हा गर्लफ्रेंडसोबत फिरणाऱ्या स्टॉयनिसला फोटोग्राफर ओळखत नाही...; पाहा व्हिडिओ

Video: अमेरिकेतील एका फोटोग्राफरने गर्लफ्रेंडबरोबर फिरणाऱ्या स्टॉयनिसला ओळखले नव्हते, या घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

Pranali Kodre

Photographer fails to recognize Australia cricketer Marcus Stoinis:

क्रिकेट विश्वात मार्कस स्टॉयनिस हे नाव अनेकांना परिचित आहे. स्टॉयनिस हा ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघातील वनडे आणि टी20 प्रकारातील प्रमुख खेळाडूंपैकी एक आहे. तो 2021 मध्ये टी20 वर्ल्डकप जिंकणाऱ्या ऑस्ट्रेलियन संघाचाही भाग होता.

पण असे असले तरी अमेरिकेतील एका फोटोग्राफरने त्याला ओळखले नव्हते, या घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ डेव्हिड गुरेरो नावाच्या अमेरिकेतील फोटोग्राफरने सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

यामध्ये तो अमेरिकेत सुट्ट्यांची मजा घेत असलेल्या स्टॉयनिस आणि त्याची गर्लफ्रेंड साराह झानुच यांना थांबवतो आणि त्यांच्याकडे त्यांचे फोटो घेण्याबद्दल विचारणा करतो. यावेळी डेव्हिडने त्यांना त्याचे आधीचे कामही दाखवले.

तसेच या व्हिडिओमध्ये असेही दिसते की डेव्हिडने त्यांना ते कुठून आले आहेत, असेही विचारले. एकूणच त्यांच्या संभाषणातून त्याने स्टॉयनिसला ओळखल्याचे दिसले नाही. डेव्हिडने स्टॉयनिस आणि त्याच्या गर्लफ्रेंडचे काही फोटो काढले.

दरम्यान, डेव्हिडने हा व्हिडिओ शेअर केल्यानंतर त्याला अनेक कमेंट्स आल्या असून अनेकांनी त्याला तो ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू स्टॉयनिस असल्याचे सांगितले.

त्यानंतर डेव्हिडने आणखी एक पोस्ट केली असून ज्यात त्याने स्टॉयनिस आणि साराहचे फोटो शेअर केले असून त्याला कॅप्शन दिले की 'म्हणूनच मला मी जे करतो त्याचा आनंद आहे, कारण तुम्ही कोणाला भेटाल हे तुम्हाला कधीच माहीत नसते.'

स्टॉयनिस आणि साराह हे या महिन्याच्या सुरुवातीला अमेरिकेत फिरायला गेले होते.

स्टॉयनिसची कारकिर्द

स्टॉयनिसने त्याच्या कारकिर्दीत 60 वनडे आणि 51 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळले आहेत. त्याने 60 वनडेत खेळताना 1 शतक आणि 6 अर्धशतकांसह 1326 धावा केल्या आहेत. तसेच 40 विकेट्स घेतल्या आहेत. याशिवाय त्याने 51 आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यांमध्ये 2 अर्धशतकांसह 803 धावा केल्या असून 18 विकेट्स घेतल्या आहेत.

तो आयपीएलमध्येही गेल्या काही सिजनपासून खेळत असून त्याने आयपीएलमध्ये 82 सामन्यांमध्ये 7 अर्धशतकांसह 1478 धावा केल्या आहेत आणि 39 विकेट्स घेतल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: पार्किंगचा वाद विकोपाला गेला, पर्ये सत्तरीत दोन तरुणांमध्ये तुंबळ हाणामारी; एकाला अटक

Pandharpur Wari: गोव्यातून पंढरपूरला जाऊन यायला दीड महिना लागायचा, परतल्यावर गावातील लोक भजन करीत त्यांना घरी न्यायचे

Goa News Live Updates: महिना उलटला पण कचरा तसाच

Ivory Suggling Khanapur: खानापूरमध्ये गुन्हे शाखेची मोठी कारवाई, हस्तिदंत तस्करी करणाऱ्या रॅकेटचा केला पर्दाफाश; 7 हस्तिदंतांसह तिघांना अटक

दोनवेळा घर कोसळले, मदत नाही फक्त आश्वासनं मिळाली; कोलवाळमधील 65 वर्षीय महिलेचा एकाकी संघर्ष

SCROLL FOR NEXT