IND vs AUS: भारत दौऱ्यापूर्वी ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का! 'हा' दिग्गज होणार वनडे मालिकेतून बाहेर?

India vs Australia: ऑस्ट्रेलियाचा स्टार क्रिकेटर भारताविरुद्धच्या आगामी वनडे मालिकेतून बाहेर होणार असल्याची चर्चा होत आहे.
Australia
AustraliaDainik Gomantak
Published on
Updated on

Australia captain could miss ODI series against India in September:

ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघ गेल्या काही महिन्यांपासून यशाची चव चाखत आहेत. त्यांनी कसोटी चॅम्पियनशीप स्पर्धा जिंकल्यानंतर इंग्लंडमध्ये झालेली ऍशेस मालिका 2-2 अशी बरोबरीत राखली. याबरोबरच ऍशेस ट्रॉफीही आपल्याकडेच राखण्यात यश मिळवले.

आता ऑस्ट्रेलिया समोर मोठे आव्हान असणार आहे, ते भारत दौऱ्याचे. पण त्यापूर्वीच त्यांना मोठा धक्का बसला आहे. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स भारताविरुद्ध सप्टेंबरमध्ये होणाऱ्या 3 सामन्यांच्या वनडे मालिकेला मुकण्याची शक्यता आहे.

Australia
Ashes 2023: स्मिथचा कॅच स्टोक्सनं घेतलेला, पण 'या' नियमामुळे ठरला 'नॉटआऊट'

ऍशेस मालिकेतील अखेरच्या कसोटी सामन्यात कमिन्सच्या डाव्या हाताच्या मनगटाला दुखापत झाली आहे. त्यामुळे त्याचे मनगट फ्रॅक्चर झाल्याची संभावना व्यक्त केली जात आहे. कमिन्सला पाचव्या ऍशेस कसोटीच्या पहिल्याच दिवशी मनगटाची दुखापत झाली होती.

त्यानंतर तो मनगटाला खूप मलमपट्ट्या बांधून पूर्ण सामना खेळला होता. पण चांगली गोष्ट इतकीच होती की कमिन्स उजव्या हाताने गोलंदाजी करत असल्याने त्याला गोलंदाजीत अडथळा आला नाही, मात्र फलंदाजी करताना ही दुखापत समस्या ठरत आहे.

कमिन्स गेल्या दोन महिन्यात 6 कसोटी सामने खेळला आहे. त्यामुळे आगामी वर्ल्डकपचा विचार करतान त्याला ऑस्ट्रेलिया आगामी दक्षिण आफ्रिका दौरा आणि भारत दौऱ्यातून विश्रांती देण्याची शक्यता नाकारता येत नाही. क्रिकेट ऑस्ट्रेलिया पुढच्या आठवड्यात या दोन्ही दौऱ्यांसाठी संघाची निवड करण्याची शक्यता आहे.

Australia
Ashes 2023: मालिका बरोबरीत सुटली, तरी इंग्लंड-ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का! ICC ने कापले WTC पाँइंट्स

तथापि, कमिन्सला जर विश्रांती देण्यात आली, तर त्याच्या अनुपस्थितीत ऑस्ट्रेलियाचे कर्णधारपद कोणाला द्यायचे हा प्रश्न क्रिकेट ऑस्ट्रेलियासमोर असेल. मार्चमध्ये कमिन्सच्या अनुपस्थितीत स्टीव्ह स्मिथने नेतृत्वाची जबाबदारी सांभाळली होती. पण आता मिचेल मार्श देखील नेतृत्वासाठी चांगला पर्याय असणार आहे.

ऑस्ट्रेलिया ऑगस्ट-सप्टेंबर दरम्यान दक्षिण आफ्रिका दौऱ्यात 3 टी20 सामने आणि 5 वनडे सामने खेळणार आहे. त्यानंतर ऑस्ट्रेलियन संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. ऑस्ट्रेलिया भारत दौऱ्यावर 22 सप्टेंबरपासून 3 सामन्यांची वनडे मालिका खेळणार आहेत.

त्यानंतर भारतात होणारा वर्ल्डकप 2023 स्पर्धेत ऑस्ट्रेलिया सहभागी होईल. या स्पर्धेनंतर लेगचच 23 नोव्हेंबर ते 3 डिसेंबर दरम्यान भारताविरुद्ध 5 सामन्यांची टी20 मालिका खेळवली जाणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com