Australia Captain: ऑस्ट्रेलियाला मिळाला नवा कर्णधार, भारताला टेंशन देणारा अष्टपैलू करणार कॅप्टन्सी

Australia T20I Captain: ऑस्ट्रेलियाने आगामी टी20 मालिकेसाठी संघ जाहीर केला असून स्टार अष्टपैलू क्रिकेटरकडे नेतृत्वाची धूरा देण्यात आली आहे.
Glenn Maxwell | Mitch Marsh
Glenn Maxwell | Mitch Marsh Dainik Gomantak
Published on
Updated on

Mitchell Marsh captain Australia in T20I Series tour of South Africa: ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ या महिन्याच्या अखेरीस दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात ऑस्ट्रेलियाला 3 टी20 आणि 5 वनडे सामने खेळायचे आहेत. दरम्यान, या दौऱ्यातील टी२० मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाने आपला संघ जाहीर केला आहे.

टी२० मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाने कर्णधारपदाची माळ अष्टपैलू मिचेल मार्शच्या गळ्यात टाकली आहे. ऍरॉन फिंचने आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमधून यावर्षाच्या सुरुवातीला निवृत्तीची घोषणा केली होती. त्यानंतर पहिल्यांदाच मार्शकडे ऑस्ट्रेलियन संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी आली आहे.

फिंचने ऑस्ट्रेलियाचे 76 टी20 सामन्यांमध्ये नेतृत्व केले होते. तसेच त्याने त्याच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाला पहिल्यांदा टी20 वर्ल्डकपही जिंकून दिला. त्याच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने 2021 साली दुबईमध्ये टी20 वर्ल्डकप जिंकला होता.

Glenn Maxwell | Mitch Marsh
Ashes 2023: मालिका बरोबरीत सुटली, तरी इंग्लंड-ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का! ICC ने कापले WTC पाँइंट्स

दरम्यान, मार्शला केवळ दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील टी२० मालिकेसाठी कर्णधार करण्यात आलेले आहे. अद्याप फिंचच्या जागेवर पूर्णवेळ टी२० कर्णधाराची निवड करण्यात आलेली नाही. यापूर्वी फिंचने निवृत्ती घेण्याआधी त्याच्या अनुपस्थितीत मॅथ्यू वेडने प्रभारी टी२० कर्णधार म्हणून जबाबदारी सांभाळली होती.

मार्शने 2021 साली साली ऑस्ट्रेलियाला टी20 वर्ल्डकप विजेतेपद जिंकून देण्यात मोलाचा वाटा उचलला होता. अंतिम सामन्यात तो सामनावीर देखील ठरला होता. तसेच मार्च 2023 मध्ये भारताविरुद्ध झालेल्या वनडे मालिकेतही त्याने शानदार कामगिरी करत ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून दिला होता. तो त्या मालिकेत मालिकावीर ठरला होता.

Glenn Maxwell | Mitch Marsh
Ashes 2023: स्मिथचा कॅच स्टोक्सनं घेतलेला, पण 'या' नियमामुळे ठरला 'नॉटआऊट'

वनडे संघाचीही घोषणा

दरम्यान, क्रिकेट ऑस्ट्रेलियाने १८ जणांचा वनडे संघही जाहीर केला असून हाच संघ ५ ऑक्टोबर पासून भारतात होणाऱ्या वनडे वर्ल्डकपसाठी ऑस्ट्रेलियाचा प्राथमिक संघ आहे. या संघातील आश्चर्याची गोष्ट म्हणजे स्टार फलंदाज मार्नस लॅब्युशेनला संघातून वगळण्यात आले आहे.

असा आहे ऑस्ट्रेलियाचा संघ

  • टी20 संघ - मिचेल मार्श (कर्णधार), सीन ऍबॉट, जेसन बेहरेनडॉर्फ, टिम डेव्हिड, नॅथन एलिस, ऍरोन हार्डी, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, स्पेन्सर जॉन्सन, ग्लेन मॅक्सवेल, मॅट शॉर्ट, स्टीव्ह स्मिथ, मार्कस स्टॉयनिस, ऍडम झम्पा

  • वनडे संघ - पॅट कमिन्स (कर्णधार), सीन ऍबॉट, ऍश्टन अगर, ऍलेक्स कॅरी, नॅथन एलिस, कॅमेरॉन ग्रीन, ऍरॉन हार्डी, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, तन्वीर संघा, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क, मार्कस स्टॉयनिस , डेव्हिड वॉर्नर, ऍडम झम्पा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com