Team India Dainik Gomantak
क्रीडा

IRE vs IND: बुमराहच्या नेतृत्वातील टीम इंडिया आयर्लंडला रवाना, असा आहे संपूर्ण दौरा

India tour of Ireland: भारतीय टी20 संघ आयर्लंडला रवाना झाला असून त्यांचे विमानतळावरील फोटो व्हायरल झाले आहेत.

Pranali Kodre

Team India Squad Leaves for Ireland: भारतीय क्रिकट संघाचा वेस्ट इंडिज दौरा नुकताच 13 ऑगस्ट रोजी संपला आहे. त्यानंतर आता भारताचा संघ आयर्लंड दौऱ्यावर रवाना झाला आहे.

आयर्लंड दौऱ्यासाठी हार्दिक पंड्या, सूर्यकुमार यादव, युझवेंद्र चहल अशा अनेक सिनियर खेळाडूंना विश्रांती देण्यात आली असून अनेक युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. त्यामुळे या दौऱ्यातून अनेक भारतीय खेळाडू आंतरराष्ट्रीय पदार्पण करताना दिसू शकतात.

दरम्यान, भारतीय संघाला आयर्लंड दौऱ्यात 3 टी20 सामन्यांची मालिका खेळायची असून 18 ऑगस्टपासून सुरु होणार आहे. या दौऱ्यासाठी मंगळवारी भारतीय संघातील खेळाडू आयर्लंडला रवाना झाले.

रिपोर्ट्सनुसार आयर्लंड दौऱ्यासाठी संघात असलेले काही खेळाडू जे वेस्ट इंडिज दौऱ्याचाही भाग होते, ते खेळाडू कॅरेबियनमधूनच आयर्लंडला जाणार होते. तर उर्वरित खेळाडू भारतातून आयर्लंडला रवाना होणार होते.

भारतातून खेळाडूंनी आयर्लंडला मंगळवारी उड्डाण केले आहे. त्याचे फोटोही बीसीसीआयने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये जसप्रीत बुमराह, ऋतुराज गायकवाड, प्रसिद्ध कृष्णा, रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर, शिवम दुबे असे काही खेळाडू दिसत आहेत.

आयर्लंड दौऱ्यावर भारताच्या टी20 संघाचे नेतृत्व जसप्रीत बुमराह करणार आहे. बुमराह या मालिकेतून 10 महिन्यांनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करणार आहे. तो पाठीच्या दुखापतीमुळे गेल्या 10 महिन्यात भारताकडून खेळला नव्हता. पण आता थेट कर्णधार म्हणूनच त्याचे पुनरागमन होणार आहे. तसेच या संघाचे उपकर्णधारपद ऋतुराज गायकवाडला देण्यात आले आहे.

  • आयर्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघ - जसप्रीत बुमराह (कर्णधार), ऋतुराज गायकवाड (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), तिलक वर्मा, रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), शिवम दुबे, शाहबाज अहमद, रवी बिश्नोई, प्रसिद्ध कृष्णा, अर्शदीप सिंग, मुकेश कुमार, आवेश खान.

भारताचा आयर्लंड दौरा

भारताचा हा एकूण आयर्लंडचा चौथा दौरा असणार आहे. यापूर्वी भारताने 2007 मध्ये एकमेव वनडे सामना आयर्लंडला खेळला होता. त्यानंतर 2018 आणि 2022 साली भारताने 2 सामन्यांच्या टी20 मालिका आयर्लंडला खेळल्या.

आयर्लंड आणि भारत यांच्यातील टी20 मालिका 18 ऑगस्ट ते 23 ऑगस्ट दरम्यान होणार आहे. या मालिकेतील तिन्ही टी20 सामने डब्लिनच्या सीमेवरील मलाहाईड येथे होणार आहेत. तसेच सर्व सामने भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी ७.३० वाजता सुरु होणार आहेत.

भारत विरुद्ध आयर्लंड टी20 मालिका वेळापत्रक (वेळ - भारतीय प्रमाणवेळेनुसार)

  • 18 ऑगस्ट - पहिला टी20 सामना, मलाहाईड (वेळ - संध्याकाळी 7.30 वाजता)

  • 20 ऑगस्ट - दुसरा टी20 सामना, मलाहाईड (वेळ - संध्याकाळी 7.30 वाजता)

  • 23 ऑगस्ट - तिसरा टी20 सामना, मलाहाईड (वेळ - संध्याकाळी 7.30 वाजता)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Assembly Winter Session 2026: गोवा सरकारचे हिवाळी अधिवेशन 12 जानेवारीपासून; रामा काणकोणकर हल्ला, हडफडे आग प्रकरण गाजणार

Goa Fishing Boat Missing: सोमवारी निघाले, पण परतलेच नाहीत! काणकोणच्या समुद्रात मासेमारी बोट गायब; 4 मच्छिमारांचा जीव टांगणीला

'पर्रीकरांच्या काळात असं नव्हतं, आत्ताच्या गोवा सरकारमध्ये सगळे हफ्ते मागतायेत'; माजी भाजप मंत्र्याचा गंभीर आरोप, केजरीवालांनी शेअर केला व्हिडिओ

AUS vs ENG 3rd Test: इंग्लंडच्या फलंदाजांना धडकी भरवणारा गोलंदाज आता घडवणार इतिहास; तिसऱ्या कसोटीत मिचेल स्टार्क मोडणार अँडरसनचा मोठा रेकॉर्ड!

Goa Today News Live: आयडीसीमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ! सांकवाळमधील कंपनीत घुसून लंपास केला लाखो रुपयांचा मुद्देमाल

SCROLL FOR NEXT